रायपूर–हैदराबाद द्रुतगतीमार्ग
Appearance
रायपूर–हैदराबाद द्रुतगतीमार्ग | |
---|---|
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | ५३० किलोमीटर (३३० मैल) |
सुरुवात | रायपूर, छत्तीसगढ |
शेवट | हैदराबाद, तेलंगणा |
स्थान | |
शहरे | रायपूर, दुर्ग, राजनांदगांव, गडचिरोली, रामगुंडम, करीमनगर, हैदराबाद |
राज्ये | छत्तीसगढ, महाराष्ट्र, तेलंगणा |
रायपूर–हैदराबाद द्रुतगतीमार्ग, एक नियोजित ग्रीनफील्ड, प्रवेश-नियंत्रित, ५३०-किलोमीटर (३३० मैल) लांबीचा सहा-पदरी द्रुतगतिमार्गआहे. हा द्रुतगतिमार्ग रायपूर आणि हैदराबाद दरम्यान भारतातील छत्तीसगढ, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमधून धावेल. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या सद्य प्रस्तावानुसार, हा द्रुतगतिमार्ग रायपूरहून दुर्ग, राजनांदगाव, गडचिरोली, गोंडपिपरी, रामागुंडम आणि करीमनगर मार्गे हैदराबादला पोहोचेल. यामध्ये १०४ किमी छत्तीसगढमध्ये आणि ७७ किमी महाराष्ट्रात बांधण्यात येणार आहे. एकूण १८१ किमी लांबीचा रास्ता छत्तीसगड आणि महाराष्ट्रात असेल. उर्वरित ३३८ किमीचा रस्ता तेलंगणात बांधला जाईल.[१][२]
हे सुद्धा पहा
[संपादन]- छत्तीसगढमधील द्रुतगती मार्ग
- भारतामधील द्रुतगतीमार्ग
- महाराष्ट्रातील द्रुतगतीमार्ग
संदर्भ
[संपादन]- ^ "23 new expressways and highways coming up in next 5 years | India News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत).
- ^ "नई सड़क से राहत: रायपुर से हैदराबाद 519 और लखनादौन के लिए 300 किमी का नया एक्सप्रेस वे". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 20 July 2022.