Jump to content

रत्‍नमाला (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कमल भिवंडकर
जन्म रत्‍नमाला
१९२४
महाराष्ट्र, भारत
मृत्यू २४ जानेवारी १९८९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ १९३८- १९८९
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट रुख्मिणी स्वयंवर(१९४६), माझा राम (१९४९), गोकुळचा राजा (१९५०), रामराम पवना (१९५०), सांगते आयका (१९५९), मानिनी (१९६१), कोर्टाची पायरी (१९७०), रंगपंचमी (१९७१), काली बायको (१९७०) ), मुंबईचा जावई (१९७०)
पती राजा पंडित

रत्नमाला (१९२४ - २४ जानेवारी १९८९) ह्या एक भारतीय चित्रपट सृष्टीतील महिला अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका निभावल्या होत्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे दादा कोंडकेच्या आई म्हणून त्या ओळखल्या जात असत. याचे मुख्य कारण म्हणजे दादा कोंडकेच्या प्रत्येक चित्रपटात रत्नमाला ह्या त्यांच्या आईची भूमिका पार पाडत असत.

त्यांचे मूळ नाव कमल भिवंडकर असे होते. तर त्यांच्या पतीचे नाव राजा पंडित होते.[] त्यांनी सर्वप्रथम इ.स. १९३८ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी भगवा झेंडा या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या वेळी त्यांचे नाव कमल भिवंडकर पासून रत्नमालाबाई असे बदलण्यात आले. त्यानंतर प्रथमच त्यांनी ‘'माझी लाडकी’' (१९३९) या चित्रपटात नायिकेची भूमिका निभावली. तर ‘'स्टेशन मास्तर’' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.[]

चित्रपट

[संपादन]
चित्रपटाचे नाव प्रदर्शनाचे वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
भगवा झेंडा इ.स.१९३८ मराठी अभिनय वय (१४ वर्ष)
माझी लाडकी इ.स.१९३९ मराठी अभिनय
दहा वाजता इ.स.१९४२ मराठी अभिनय
स्टेशन मास्टर इ.स.१९४६ हिंदी अभिनय
रुक्मिणी स्वयंवर इ.स.१९४६ मराठी अभिनय
माझा राम इ.स.१९४९ मराठी अभिनय
गोकुळचा राजा इ.स.१९५० मराठी अभिनय
सांगत्ये ऐका इ.स.१९४६ मराठी अभिनय
रामराम पाव्हणं इ.स.१९५० मराठी अभिनय
सांगत्ये ऐका इ.स.१९५९ मराठी अभिनय
मानिनी इ.स.१९६१ मराठी अभिनय
रंगपंचमी इ.स.१९६१ मराठी अभिनय
वैजयंता इ.स.१९६१ मराठी अभिनय
गरिबाघरची लेक इ.स.१९६२ मराठी अभिनय
जावई माझा भला इ.स.१९६३ मराठी अभिनय
यालाच म्हणतात प्रेम इ.स.१९६४ मराठी अभिनय
धन्य ते संताजी धनाजी इ.स.१९६८ मराठी अभिनय
धर्मकन्या इ.स.१९६८ मराठी अभिनय
कोर्टाची पायरी इ.स.१९७० मराठी अभिनय
काळी बायको इ.स.१९७० मराठी अभिनय
मुंबईचा जावई इ.स.१९७० मराठी अभिनय
सोंगाड्या इ.स.१९७१ मराठी अभिनय
एकटा जीव सदाशिव इ.स.१९७२ मराठी अभिनय
हऱ्या नाऱ्या झिंदाबाद इ.स.१९७२ मराठी अभिनय
थापाड्या इ.स.१९७३ मराठी अभिनय
पांडू हवालदार इ.स.१९७५ मराठी अभिनय
प्रीत तुझी माझी इ.स.१९७५ मराठी अभिनय
रामराम गंगाराम इ.स.१९७७ मराठी अभिनय
बोट लावीन तिथं गुदगुल्या इ.स.१९७८ मराठी अभिनय
लक्ष्मी इ.स.१९७८ मराठी अभिनय
ह्योच नवरा पाहिजे इ.स.१९८० मराठी अभिनय
आली अंगावर इ.स.१९८२ मराठी अभिनय
नवरे सगळे गाढव इ.स.१९८२ मराठी अभिनय
ढगाला लागली कळ इ.स.१९८५ मराठी अभिनय
मुका घ्या मुका इ.स.१९८७ मराठी अभिनय
रुक्मिणी स्वयंवर इ.स.१९४६ मराठी अभिनय
रुक्मिणी स्वयंवर इ.स.१९४६ मराठी अभिनय

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Ratnamala". Cinemazzi. 2024-04-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रत्‍नमाला (अभिनेत्री) चे पान (इंग्लिश मजकूर)