Jump to content

रत्‍नमाला (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रत्नमाला (अभिनेत्री) या पानावरून पुनर्निर्देशित)
कमल भिवंडकर
जन्म रत्‍नमाला
१९२४
महाराष्ट्र, भारत
मृत्यू २४ जानेवारी १९८९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ १९३८- १९८९
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट रुख्मिणी स्वयंवर(१९४६), माझा राम (१९४९), गोकुळचा राजा (१९५०), रामराम पवना (१९५०), सांगते आयका (१९५९), मानिनी (१९६१), कोर्टाची पायरी (१९७०), रंगपंचमी (१९७१), काली बायको (१९७०) ), मुंबईचा जावई (१९७०)
पती राजा पंडित

रत्नमाला (१९२४ - २४ जानेवारी १९८९) ह्या एक भारतीय चित्रपट सृष्टीतील महिला अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका निभावल्या होत्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे दादा कोंडकेच्या आई म्हणून त्या ओळखल्या जात असत. याचे मुख्य कारण म्हणजे दादा कोंडकेच्या प्रत्येक चित्रपटात रत्नमाला ह्या त्यांच्या आईची भूमिका पार पाडत असत.

त्यांचे मूळ नाव कमल भिवंडकर असे होते. तर त्यांच्या पतीचे नाव राजा पंडित होते.[] त्यांनी सर्वप्रथम इ.स. १९३८ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी भगवा झेंडा या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या वेळी त्यांचे नाव कमल भिवंडकर पासून रत्नमालाबाई असे बदलण्यात आले. त्यानंतर प्रथमच त्यांनी ‘'माझी लाडकी’' (१९३९) या चित्रपटात नायिकेची भूमिका निभावली. तर ‘'स्टेशन मास्तर’' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.[]

चित्रपट

[संपादन]
चित्रपटाचे नावप्रदर्शनाचे वर्ष (इ.स.)भाषासहभाग
भगवा झेंडाइ.स.१९३८ मराठीअभिनय वय (१४ वर्ष)
माझी लाडकीइ.स.१९३९ मराठीअभिनय
दहा वाजताइ.स.१९४२ मराठीअभिनय
स्टेशन मास्टरइ.स.१९४६ हिंदीअभिनय
रुक्मिणी स्वयंवरइ.स.१९४६ मराठीअभिनय
माझा रामइ.स.१९४९ मराठीअभिनय
गोकुळचा राजाइ.स.१९५० मराठीअभिनय
सांगत्ये ऐकाइ.स.१९४६ मराठीअभिनय
रामराम पाव्हणंइ.स.१९५० मराठीअभिनय
सांगत्ये ऐकाइ.स.१९५९ मराठीअभिनय
मानिनीइ.स.१९६१ मराठीअभिनय
रंगपंचमीइ.स.१९६१ मराठीअभिनय
वैजयंताइ.स.१९६१ मराठीअभिनय
गरिबाघरची लेकइ.स.१९६२ मराठीअभिनय
जावई माझा भलाइ.स.१९६३ मराठीअभिनय
यालाच म्हणतात प्रेमइ.स.१९६४ मराठीअभिनय
धन्य ते संताजी धनाजीइ.स.१९६८ मराठीअभिनय
धर्मकन्याइ.स.१९६८ मराठीअभिनय
कोर्टाची पायरीइ.स.१९७० मराठीअभिनय
काळी बायकोइ.स.१९७० मराठीअभिनय
मुंबईचा जावईइ.स.१९७० मराठीअभिनय
सोंगाड्याइ.स.१९७१ मराठीअभिनय
एकटा जीव सदाशिवइ.स.१९७२ मराठीअभिनय
हऱ्या नाऱ्या झिंदाबादइ.स.१९७२ मराठीअभिनय
थापाड्याइ.स.१९७३ मराठीअभिनय
पांडू हवालदारइ.स.१९७५ मराठीअभिनय
प्रीत तुझी माझीइ.स.१९७५ मराठीअभिनय
रामराम गंगारामइ.स.१९७७ मराठीअभिनय
बोट लावीन तिथं गुदगुल्याइ.स.१९७८ मराठीअभिनय
लक्ष्मीइ.स.१९७८ मराठीअभिनय
ह्योच नवरा पाहिजेइ.स.१९८० मराठीअभिनय
आली अंगावरइ.स.१९८२ मराठीअभिनय
नवरे सगळे गाढवइ.स.१९८२ मराठीअभिनय
ढगाला लागली कळइ.स.१९८५ मराठीअभिनय
मुका घ्या मुकाइ.स.१९८७ मराठीअभिनय
रुक्मिणी स्वयंवरइ.स.१९४६ मराठीअभिनय
रुक्मिणी स्वयंवरइ.स.१९४६ मराठीअभिनय

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Ratnamala". Cinemazzi. 2023-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2024-04-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]

इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील रत्‍नमाला (अभिनेत्री) चे पान (इंग्लिश मजकूर)