Jump to content

महामस्तकाभिषेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुधाचा अभिषेक

महामस्तकाभिषेक हा जैन धर्मातील एक धार्मिक उत्सव आहे.[१] कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्र्वर यांच्या भव्य मूर्तीला केला जाणारा अभिषेक हा एक विशेष पर्व उत्सव मानला जातो. दर १२ वर्षांनी एकदा या उत्सवाचे आयोजन केले जाते.[२]

महत्त्व[संपादन]

जैन धर्मातील पहिले तीर्थंकर भगान ऋषभदेव यांचे पुत्र असलेले भगवान बाहुबली यांचे जीवन अलौकिक मानले जाते. त्यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, मोक्ष हे त्यांच्या चरित्रातील ठळक पैलू मानले जातात. सुमारे ५८ फूट उंची असलेली बाहुबली यांची मूर्ती कर्नाटक राज्यातील विंध्यगिरी पर्वतावर स्थापन केलेली असून शिल्पशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानली जाते.[२] या मूर्तीची निर्मिती इसवी सन ९८३ मध्ये करण्यात आली आहे.

धार्मिक विधी[संपादन]

महामस्तकाभिषेक

या उत्सवामध्ये धार्मिक पूजेचे विशेष स्थान आहे. मंत्राने पवित्र केलेले पाणी आणि चंदन यांच्या एकत्र मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो. एक आठवडा हा विधी सुरू राहतो. यालाच महामस्तकाभिषेक असे म्हतले जाते. हे अभिषेकाचे पाणी विशेष तयार केलेल्या भांड्यातून भक्तांच्या हातून वरती नेले जाते. दूध, उसाचा रस, केशराचा लेप हे सर्व चंदन, हळद आणि कुंकू असे सर्व मिश्रण करून त्याचा अभिषेक मूर्तीवर केला जातो.[३] त्यानंतर सोने चांदी आणि मौल्यवान धातू पासून तयार केलेली नाणी अर्पण केली जातात. उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात आकाशातून विमानातून मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाते.[४]

हे ही पहा[संपादन]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bahubali Mahamastakabhisheka Mahotsav: Here is the history of the Jain festival PM Modi attended today". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-02-19. 2021-12-11 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Bahubali Mahamasthakabhisheka Mahotsava - 2018". Bahubali Mahamasthakabhisheka Mahotsava - 2018 (इंग्रजी भाषेत). 2021-12-12 रोजी पाहिले.
  3. ^ Kumar, Brajesh (2003). Pilgrimage Centres of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-7182-185-3.
  4. ^ "ShravanaBelagola MahaMastakabhisheka Celebration". Karnataka Tourism (इंग्रजी भाषेत). 2021-12-12 रोजी पाहिले.