दापोली गाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

दापोली नावाची अनेक गावे आहेत, त्यांतले एक दापोली गाव महाड शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या ५०० ते ६०० आहे. हे निसर्गरम्य आणि डोंगर नद्यांच्या कुशीत वसलेले असे एक छोटेसे गाव आहे

किल्ले लिंगाण्याच्या पायथ्याशी असलेले हे गाव किल्ले रायगड पासून ८-९ किलोमीटर अंतरावर आहे.

दापोली गाव प्रामुख्याने तीन भागांत विभागले गेले आहे. कदम आवाड, मोरे आवाड (पाटील आवाड), दापोली पाडा, आणि आदिवासी वाडी.

गावामध्ये २५०-३०० घरे आहेत. आदिवासी वाडी मुख्य गावापासून ३००-४०० मीटर अंतरावर आहे. गावातील काही घरे नदीच्या पलीकडे असल्यामुळे त्या वस्तीला दापोली पाडा असे म्हटले जाते. नदी पार करून दापोली पाड्याला जाण्यासाठी प्रशस्त असा पूल आहे.

गावामध्ये आठवी इयत्तेपर्यंतपर्यंत शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ६ किलो मीटर अंतर पार करून जावे लागते..

वैशिष्ट्ये

  • शिवाजी महाराजांच्या काळातील एक शंकराचे देऊळ.
  • जिल्हा परिषद शाळा (स्थापना सन १९३६)
  • किल्ले लिंगाणा च्या पायथ्याशी असलेले गाव
  • महाड तालुक्यातील प्रख्यात असलेले आई वरदानी मातेचे मंदिर या गावामध्ये आहे
  • महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त असलेले गाव
  • तलाठी कार्यालय (सजा दापोली, पंंदेेरी, पाने, वारंगी)
  • पोस्ट ऑफिस (दापोली, पंदेरी)

बिरवाड़ी मार्केट[संपादन]

दापोली गावातील नागरिकांसाठी बिरवाड़ी ही मुख्य बाजारपेठ आहे. बिरवाड़ीला जाण्यासाठी दापोलीतील नागरिकांना १९ किलोमीटरचा प्रवास करून जावे लागले. ही बाजारपेठ दापोली गावासोबतच इतर गावांचीसुद्धा मुख्य बाजारपेठ आहे. महाड बाजारपेठ ३२ किलोमीटर दूर अंतरावर असल्यामुळे बिरवाड़ी बाजारपेठेत लोकांच येणेजाणे जास्त प्रमाणात असते.