फौजी अंबावडे (सैनिकी गाव)
Jump to navigation
Jump to search
१९७१[काळ सुसंगतता ?] मध्ये भारत व चीन या दोन देशांमध्ये झालेल्या लढाईत महाराष्ट्रातील रायगड जिल्हा महाड तालुक्यातील अंबावडे गावातील सुमारे १००हून अधिक सैनिक धारातीर्थी पडले होते. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. याची माहिती तत्कालीन पंतप्रधान दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचली. याची त्वरित दखल घेत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंबावडे गावाला भेट दिली. या भेटीनंतर अंबावडे गावातील सैनिकांच्या स्मरणार्थ अंबावडे गावाचे नामकरण फौजी अंबावडे असे करण्यात आले. आजही या गावात लष्करात भरती होण्याची परंपरा सुरू आहे. प्रत्येक कुटुंबातील एकतरी पुरुष स्वेच्छेने लष्करात भरती होत आहेत.