मनीषा साठे
मनीषा साठे | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | २६ मे १९५३ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी |
पारिवारिक माहिती | |
नातेवाईक | तेजस्विनी साठे |
संगीत साधना | |
प्रशिक्षण संस्था | मनीषा नृत्यालय |
गुरू | पं. बाळासाहेब गोखले पं. गोपाळकृष्ण |
गायन प्रकार | हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, कथक |
संगीत कारकीर्द | |
पेशा | नृत्यांगना |
गौरव | |
पुरस्कार | महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, २००६ |
बाह्य दुवे | |
संकेतस्थळ |
मनीषा साठे (जन्म : २६ मे १९५३) या कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू आहेत.
शिक्षण
[संपादन]मनीषा साठे यांनी कथक नृत्याचे शिक्षण लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले. पुढे त्यांनी पं. गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबई येथे शिक्षण सुरू ठेवले.[१]
कारकीर्द
[संपादन]आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, लखनौ नृत्य महोत्सव, गोहत्ती येथील कामाख्या महोत्सव, मुंबईमधील नेहरू सेंटर आणि टाटा थिएटर अशा भारताच्या विविध ठिकाणी कथक नृत्य सादर केले आहे. तसेच भारताबाहेर अमेरिका, चीन, बहरैन, स्वित्झर्लंड, स्वीडन, इ. देशांत त्यांनी कार्यक्रम केले आहेत. कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्व संगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जपानी संगीताबरोबरही कथक सादर केले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक फ्युजन मैफली सादर केल्या आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात योगदान
[संपादन]त्या पुणे विद्यापीठातील ललित कलाकेंद्र, पुण्यातील भारती विद्यापीठ व अहमदनगर येथील व्हीडिओकॉन अकादमी येथे अभ्यागत प्राध्यापिका म्हणून शिकवतात. पुणे विद्यापीठात पी.एच.डी.साठीच्या मार्गदर्शक अहेत. त्यांची कन्या आणि शिष्या शांभवी दांडेकर हीही कथक नृत्यांगना आहे. त्यांची स्नुषा तेजस्विनी साठे ही मनीषा साठे यांचा वारसा चालवत आहे.
नृत्यदिग्दर्शन
[संपादन]मनीषा साठे यांनी सरकारनामा आणि वारसा लक्ष्मीचा यांसह अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहोळ्यात त्यांना सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
संस्था
[संपादन]साठे ह्या मनीषा नृत्यालय ट्रस्ट या नावाची कथक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृती मिळाली आहे.
पुरस्कार
[संपादन]- सारंग सन्मान २०१९[२]
- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार २००६
- गानवर्धनचा विजया भालेराव पुरस्कार
- सिटाडेल एक्सलन्स ॲवार्ड
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री.गोळवलकर गुरुजी पुरस्कार
- अजित सोमण स्मृती पुरस्कार
- अशोक परांजपे पुरस्कार
- पुणे महापालिकेचा पं.रोहिणी भाटे पुरस्कार, , २०१७ [३]
संदर्भनोंदी
[संपादन]- ^ "कथकगुरू मनीषा साठे यांच्याशी एक संवाद | ऐसीअक्षरे". aisiakshare.com. 2020-04-05 रोजी पाहिले.
- ^ "मनीषा साठे यांना सारंग सन्मान प्रदान". Maharashtra Times. 2020-04-05 रोजी पाहिले.
- ^ "'रोहिणीताईंमुळेच नृत्याला ऊर्जितावस्था' | eSakal". www.esakal.com. 2020-04-05 रोजी पाहिले.