Jump to content

मधुकर पिचड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मधुकर काशिनाथ पिचड या पानावरून पुनर्निर्देशित)
मधुकर पिचड

मधुकर काशिनाथ पिचड (१ जून, १९४१ - ६ डिसेंबर, २०२४) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते.[][] त्यांनी १९८० ते २००९ पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. मार्च १९९५ ते जुलै १९९९ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.[][]

पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून केली. त्यानंतर ते १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते. २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[][] तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.[]

पिचड यांनी १९६१ मध्ये अमृतसागर सहकारी दूध संघ, अकोलेची स्थापना केली होती.[] ते अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. १९९३ मध्ये स्थापन झालेला हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना होता.[]

प्रारंभिक आयुष्य आणि कारकिर्द

[संपादन]

पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी राजूर, अहमदनगर जिल्ह्यात महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे शिक्षक, तर आई कमलबाई ह्या घरगृहिणी होत्या.[१०][]

फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून त्यांनी बीए एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इथेचत्यांनी विद्यार्थी दशेत राजकारणात प्रवेश केला.[]

१९७२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यापासून पिचड यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच १९७२ मध्ये पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून येऊन १९८० पर्यंत काम केले.

पिचड यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले.[११]

भूषवलेली पदे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Mumbai News: Sharad Pawar Blames Eknath Shinde's Govt For Jalna Lathi Charge". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-12-02 रोजी पाहिले.
  2. ^ "Vaibhav Pichad confirms his entry in BJP". The Asian Age. 2019-07-28. 2023-12-02 रोजी पाहिले.
  3. ^ a b c ब्युरो, सरकारनामा (2017-06-01). "आजचे वाढदिवस, मधुकरराव पिचड,शिवाजीराव कर्डिले". Politics News on Sarkarnama. 2024-09-11 रोजी पाहिले.
  4. ^ Pandit, Vivek (2000). Fearless Minds: Rights Based Approach to Organizing and Advocacy (इंग्रजी भाषेत). National Centre for Advocacy Studies. p. 227.
  5. ^ "NCP, Congress leaders including Sandeep Naik, Chitra Wagh, Vaibhav Pichad, Madhukar Pichad join BJP". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 31 July 2019. 2023-12-02 रोजी पाहिले.
  6. ^ "Ahmednagar: Veteran BJP leader Madhukar Pichad, son Vaibhav lose in Agasthi sugar factory election". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-12-02 रोजी पाहिले.
  7. ^ "NCP MLA Vaibhav Pichad to join BJP". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-07-28. 2023-12-02 रोजी पाहिले.
  8. ^ "'अमृतसागर' पिचड यांचाच". महाराष्ट्र टाइम्स. 2024-09-18 रोजी पाहिले.
  9. ^ "साखर उताऱ्यात 'अगस्ती' प्रथम". Maharashtra Times. 2024-09-18 रोजी पाहिले.
  10. ^ Marathi, TV9 (2019-07-27). "आघाडीची सत्ता पुन्हा येणार नाही, जनतेसाठी भाजपात जातोय : वैभव पिचड". TV9 Marathi. 2024-09-11 रोजी पाहिले.
  11. ^ "भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन:वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सलग 7 वेळा राहिले आमदार". divyamarathi.bhaskar.com. 6 December 2024. 6 December 2024 रोजी पाहिले.
  12. ^ Frontline (इंग्रजी भाषेत). S. Rangarajan for Kasturi & Sons. 1992. p. 21.
  13. ^ "Madhukar Pichad, three new faces to be inducted into Maha cabinet". The Times of India. 2013-06-11. ISSN 0971-8257. 2024-09-18 रोजी पाहिले.