Jump to content

मंगेश बोरगांवकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मंगेश बोरगावकर या पानावरून पुनर्निर्देशित)
मंगेश बोरगावकर
आयुष्य
जन्म १५ ऑक्टोबर, १९८९ (1989-10-15) (वय: ३४)
जन्म स्थान लातूर, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव लातूर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील राम बोरगावकर
जोडीदार अपूर्वा आठवले
नातेवाईक मधुवंती बोरगावकर, सरस्वती बोरगावकर
संगीत कारकीर्द
कार्य गायक
गौरव
गौरव अखिल भारतीय नाट्य संमेलनादरम्यान माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानित, 'संगीत उमेश फाऊंडेशन, पुणे' यांच्या वतीने 'संगीत उमेश बालगायक' हा सन्मान प्राप्त
पुरस्कार अष्टविनायक राज्यस्तरीय संगीत स्पर्धेमध्ये सलग ३ वर्षे प्रथम पारितोषिक, प्रशांत दामले राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, सा रे ग म प या मराठी कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता
बाह्य दुवे
संकेतस्थळ

मंगेश बोरगावकर (जन्म - १५ ऑक्टोबर १९८९) हा एक मराठी गायक आहे. हा सा रे ग म प या मराठी कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता होता. नाही कळले कधी, तुझ्याविना ही त्याने गायलेली गाणी लोकप्रिय आहेत. मंगेश बोरगावकर याने अनेक मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.

मंगेश याने सुरेश वाडकर, शौनक अभिषेकी, शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, रवींद्र साठे यांच्या समवेत गाण्यांच्या अनेक मैफिलीत सहभाग घेतला आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते महेश कोठारे यांनी मी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीसाठी आयोजित केलेल्या कशासाठी, प्रेमासाठी या कार्यक्रमात मंगेश याने आपली कला सादर केली.

एबीपी माझा वाहिनीसाठी फेस्टिवल ऑफ लव्ह हा कार्यक्रम मंगेश याने सादर केला. स्टार प्रवाह वाहिनीवरील तुजवीण सख्या रे या लोकप्रिय मालिकेचे शीर्षकगीत मंगेश याने गायले आहे. यासोबतच अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी त्याने आजवर आपली कला सादर केली आहे. तसेच अनेक लाईव्ह शोच्या माध्यमातून त्याने आपली कला सादर केली आहे. दिवाना झालो तुझा हा मंगेश याच्या गाण्यांचा संग्रह प्रचंड लोकप्रिय ठरला. या संग्रहामधील गाणी सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहेत.

मंगलाष्टक वन्स मोअर या मराठी चित्रपटासाठी उसवले धागे हे द्वंद्वगीत मंगेश याने गायले आहे. मेरा देश महान या हिंदी सिनेमासाठी मंगेश याने पार्श्वगायन केले आहे. गाणे मंगेशाचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीद्वारे लातूर येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मोफत राहण्याची व शिक्षणाची सोय बोरगावकर कुटुंबियांच्या वतीने करण्यात येते.

जीवन[संपादन]

मंगेश बोरगांवकरचा जन्म लातूरमध्ये झाला. हा तबलावादक सूरमणी राम बोरगावकर यांचे पुत्र आहेत. त्यांचे काका सूरमणी बाबुराव बोरगावकर हे गायक आहेत. तसेच बंधू गणेश बोरगावकर हे तबलावादक आहेत.

मंगेश याने कुटुंबातील संगीत प्रभावामुळे गायन क्षेत्राची निवड केली. याचे शालेय शिक्षण लातूर येथे तर पदव्युत्तर शिक्षण मुंबई येथे झाले. अवघ्या दीड वर्षांचे असताना मंगेश याने दूरदर्शन सह्याद्री या वाहिनीवरील भक्तिरंग या कार्यक्रमात आपली गायन कला सदर केली. ७ वर्षांचे असताना आकाशवाणी औरंगाबाद केंद्रासाठी त्याने त्यांचे कार्यक्रम ध्वनिमुद्रित केले. १३ वर्षांचे असताना फाऊंटन या नामांकित कंपनीच्या वतीने त्याच्या गाण्यांचे २ संग्रह प्रकाशित करण्यात आले.[१] [२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "मंगेश बोरगावकर". Archived from the original on 2017-04-01. ३ मे २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "मन हे बावरे..." ३ मे २०१७ रोजी पाहिले.