Jump to content

भेंडलावा (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भेंडलावा
भेंडलावा

भेंडलावा, इस्नाप, इस्नाफ, खेंकस, टिलवा, तिबड, टिंबा, टिंबली, तामण किंवा तई (इंग्लिश:Painted Snipe; हिंदी:राजचहा; संस्कृत:चित्रित कुणाल; गुजराती:पानलवा, पान लौवा) हा एक पक्षी आहे.

आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सरळ बारीक पाणलाव्यासारखी चोच.टोकाला बाक.वरून हिरवाकंच.त्यावर बदामी,काळपट काड्या व रेघोट्या.खालून तपकिरी पांढरा.डोळ्यांभोवती पांढरे वर्तुळ.डोळ्यांजवळ पांढरा डाग.खांद्यावर पांढरी पट्टी.नर मादीपेक्षा कमी देखणा.मादीच्या गळ्यावर आणि छातीवर तपकिरी,तसेच,काळा रंग नसतो. उडताना डोळ्यांभोवतालचे पांढरे वर्तुळ,नेत्रानजीकची पांढरी पट्टी,ठिपक्या-ठिपक्यांचे पंख व पाठीवरील इंग्रजीतील V आकाराचा बदामी रंगाचा पट्टा चटकन नजरेत भरतो.

वितरण

[संपादन]

भारत,पाकिस्तान,लंकाब्रह्मदेश येथे आढळून येतात.निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे. भारतात जुलै ते सप्टेंबर या काळात वीण.

निवासस्थाने

[संपादन]

दलदली व भाताची शेते.

संदर्भ

[संपादन]
  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.