Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३
झिम्बाब्वे
भारत
तारीख १८ – ३० ऑक्टोबर १९९२
संघनायक डेव्हिड हॉटन मोहम्मद अझहरुद्दीन
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल झिम्बाब्वे संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

भारतीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९९२ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. एप्रिल १९९२ च्या आयसीसी सर्वसाधारण सभेत आयसीसीने झिम्बाब्वेला संपूर्ण सदस्याचा दर्जा देत अधिकृत कसोटी सामने खेळण्याची अनुमती दिली. झिम्बाब्वेने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. डेव्हिड हॉटनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाने एकमेव कसोटी अनिर्णित राखली. पदार्पणाच्या कसोटीत पराभव टाळणारा झिम्बाब्वे पहिला वहिला देश ठरला. एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारताने ३० धावांनी जिंकला.

झिम्बाब्वेची मालिका झाल्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला.

कसोटी मालिका

[संपादन]

एकमेव कसोटी

[संपादन]
१८-२२ ऑक्टोबर १९९२
धावफलक
वि
४५६ (२१४.२ षटके)
डेव्हिड हॉटन १२१ (३२२)
मनोज प्रभाकर ३/६६ (४५ षटके)
३०७ (१६९.४ षटके)
संजय मांजरेकर १०४ (४२२)
जॉन ट्रायकोस ५/८६ (५० षटके)
१४६/४ (६६ षटके)
अँडी पायक्रॉफ्ट ४६ (९९)
कपिल देव २/२२ (१५ षटके)


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

एकमेव एकदिवसीय सामना

[संपादन]
२५ ऑक्टोबर १९९२
धावफलक
भारत Flag of भारत
२३९ (४९.४ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०९ (४९.१ षटके)
संजय मांजरेकर ७० (७०)
गॅरी क्रॉकर ४/२६ (७.४ षटके)
अँडी फ्लॉवर ६२ (१०४)
जवागल श्रीनाथ ३/३५ (१० षटके)
भारत ३० धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
सामनावीर: संजय मांजरेकर (भारत)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • झिम्बाब्वेच्या भूमीवर खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • झिम्बाब्वेत भारताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला तसेच झिम्बाब्वेने देखील मायभूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • क्रेग इव्हान्स, डेव्हिड ब्रेन, गॅरी क्रॉकर आणि ग्रँट फ्लॉवर (झि) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.