बारामती तालुक्यातील गावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बारामती तालुक्यातील गावे पुणे जिल्ह्यात आहेत.

१)शिर्सुफळ[संपादन]

शिर्सुफळ हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव बारामती शहरापासून २७.५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. शिर्सुफळ या गावी जाण्यासाठी बस आणि रेल्वे यांची सोय आहे.शिर्सुफळ हे गाव १२ वाड्यांनी मिळून बनलेलं आहे. शिर्सुफळ हे गाव श्री शिरसाई देवी च्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिरसाई देवीचे मंदिर प्राचीन काळी बांधलेले असून त्याचे पूर्ण काम हे दगडी आहे.मंदिरात दोन दीपमाळ आहेत. एकून चार छोटे कळस व एक मोठ शिखर आहे.या मंदिरात त्याच बरोबर पूर्ण शिर्सुफळ गावात खूप सारी माकडे आहेत.म्हणूनच शिर्सुफळ गावाला माकडांच गाव असेही म्हणतात.

शिर्सुफळ गावात शुक्रवार हा बाजार दिवस असतो. या गावात श्री शिरसाई विद्यालय शिर्सुफळ हि माध्यमिक शाळा आहे .तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद् शाळा शिर्सुफळ हि प्राथमिक शाळा आहे.त्याचबरोबर गावात महादेवाचे मंदिर आहे.गावात प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे.

शिर्सुफळ या गावची यात्रा अक्षय तृतीयेच्या दुसरा दिवस पासून सुरुवात होते. चार दिवस श्री शिरसाई देवीची यात्रा असते.

२)कटफळ

कटफळ हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव बारामती शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.कटफळ या गावी जाण्यासाठी बस आणि रेल्वे यांची सोय आहे. कटफळ हे गाव श्री जानाई देवी च्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.कटफळ गावात रविवार हा बाजार दिवस असतो.

३)मोरगाव

मोरगाव हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती शहरापासून ३७.९ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.मोरगाव हे गाव मोरेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अष्टविनायकामधिल हे एक मंदिर आहे.या गणपतीला मानाचा गणपती असेही म्हणतात.

४)सोमेश्वर

सोमेश्वर हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.सोमेश्वर हे गाव सोमेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.याचबरोबर या गावात सोमेश्वर सहकारि साखर कारखाना देखिल आहे.सोमेश्वर या गावात सोमेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय ,सोमेश्वर सायन्स् कॉलेज देखिल आहे.त्याच बरोबर सोमेश्वर गावात मंगळवार हा बाजार दिवस असतो. सोमेश्वर येथे मु.सा.काकडे हे महाविद्यालय आहे.