Jump to content

फ्रायबुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्राइबुर्ग
Freiburg im Breisgau
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
फ्राइबुर्ग is located in जर्मनी
फ्राइबुर्ग
फ्राइबुर्ग
फ्राइबुर्गचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 47°59′N 7°51′E / 47.983°N 7.850°E / 47.983; 7.850

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बाडेन-व्युर्टेंबर्ग
क्षेत्रफळ १५३.०७ चौ. किमी (५९.१० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९१२ फूट (२७८ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,१८,०४३
  - घनता १,४०० /चौ. किमी (३,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.moenchengladbach.de


फ्राइबुर्ग इम ब्राइसगाउ (जर्मन: Freiburg im Breisgau; फ्रेंच: Fribourg-en-Brisgau) हे जर्मनी देशाच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग या राज्यातील एक शहर आहे. हे शहर येथील ऐतिहासिक विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. फ्रायबुर्ग विद्यापीठ जर्मनीतील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे. त्याची स्थापना १४५८ साली झाली. ह्या विद्यापीठात सौर-ऊर्जेवर अतिशय उच्च दर्जाचे संशोधन होते. फ्रायबुर्ग येथील द्राक्षाच्या मळ्यासाठी व उच्च दर्जाच्या वाईनसाठी प्रसिद्ध आहे.

भूगोल[संपादन]

हे शहर जर्मनीच्या नैरुत्य कोपऱ्यामध्ये वसलेले असून शहराच्या पश्चिमेला ऱ्हाइन नदीच्या पलिकडे फ्रान्सची सीमा आहे तसेच येथुन स्वित्झर्लंडची सीमाही जवळ आहे. शहराच्या पूर्वेला श्वार्त्सवाल्डच्या डोंगररांगा आहेत.

खेळ[संपादन]

फुटबॉल हा फ्राइबुर्गमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील बुंदेसलीगामधून खेळणारा एस.सी. फ्रायबुर्ग हा संघ येथेच स्थित आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: