Jump to content

फक्रुद्दीन बेन्नूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फकरुद्दीन बेन्नूर या पानावरून पुनर्निर्देशित)
फकरुद्दीन बेन्नूर
जन्म नाव फकरुद्दीन हजरत बेन्नूर
जन्म २५ नोव्हेंबर १९३८ (1938-11-25)
मृत्यू १७ ऑगस्ट, २०१८ (वय ७९)
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी

फकरुद्दीन बेन्नूर (२५ नोव्हेंबर इ.स. १९३८ - १७ ऑगस्ट इ.स. २०१८) हे एक महाराष्ट्रातील मुस्लिम विद्वान व बुद्धिजीवी होते. वाढती कर्मठता, वाईट रूढी-परंपरा आणि हिंदुत्ववाद इत्य़ादी विषयांवर ते सन १९६८ पासून सातत्याने लिखाण करत होते. १९३८ साली सातारा जिल्ह्यात जन्मलेल्या फकरुद्दीन बेन्नूर यांनी राज्यशास्त्रात एम.ए. केल्यानंतर सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये १९६६ सालापासून अध्यापन सुरू केले. इतिहास, साम्राज्यवाद, जागतिकीकरण, इतिहासशास्त्र, भांडवलशाही, गांधीवाद, साम्राज्य़वाद, साम्यवाद, हिंदुत्व, इस्लाम आणि अरब देश हे त्याच्या अभ्यासाचे विषय होते. त्यांनी सोलापूरमधील कामगार चळवळ तसेच डाव्या चळवळीतही दीर्घ काळ काम केले आहे.[ संदर्भ हवा ]

सन १९८९मध्ये फकरुद्दीन बेन्नूर यांनी 'मुस्लिम मराठी साहित्य परिषदे'ची स्थापना करून मराठी साहित्य चळवळीत मुसलमानांचा सहभाग नोंदवला. १९९२ साली त्यांनी महाराष्ट्र पातळीवर 'मुस्लिम ओबीसी संघटना' स्थापन करून मागास मुस्लिमांचे प्रश्न अधोरेखित केले[ संदर्भ हवा ]. १९७०पासून त्यांनी सुधारणावादी चळवळीसाठी कामाला सुरुवात केली. त्याच काळापासून त्यांनी लेखन सुरू केले. सुरुवातीला त्यांनी 'दैनिक संचार' व 'सोलापूर समाचार' मधून लिखाण केले.[ संदर्भ हवा ] समाज प्रबोधन पत्रिका, अक्षरगाथा, परिवर्तनाचा वाटसरू, सत्याग्रही विचारधारा इत्यादी नियतकालिकांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे एक हजारपेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत.[१] भारतीय मुसलमान, इस्लाम व भारतातील धार्मिक हिंसाचार या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांची मराठी, हिंदी आणि उर्दूतून अशी एकूण १३हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यांतील बहुतांश पुस्तके ही मुस्लिम समाजाचे अंतरंग दर्शविणारी आहेत. दीडशेहून अधिक शोधनिबंधांचे त्यांनी वाचन केले आहे. याशिवाय देशभरात विविध चर्चासत्रे, परिसंवादांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. मुस्लिम विचारवंत व राजकीय विश्लेषक म्हणून ते ओळखले जातात.[२]

फकरुद्दीन बेन्नूर हे महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत काम करणारे सक्रिय कार्यकर्ते होते. बेन्नूर यांनी देशात व महाराष्ट्रात विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित होणार आहे. बेन्नूर यांनी असगरअली इंजिनियर आणि डॉ. मोईन शाकीर यांच्यासोबत काम केले आहे.[ संदर्भ हवा ]

प्रा. बेन्नूर हे अविवाहित होते

शिक्षण

[संपादन]

अध्यापन

[संपादन]
 • संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे व्याख्याता (१९६६ ते १९९८)

प्रकाशित पुस्तके

[संपादन]
 • कुदरत (आत्मचरित्र) (२०२३)
 • आधुनिक भारतातील मुस्लिम राजकीय विचारवंताचे राष्ट्रविषयक चर्चाविश्व (२०१३)
 • आधुनिक भारतातील मुस्लिम विचारवंत (२००७)
 • गुलमोहर (कवितासंग्रह) (२०१०)[३]
 • भारत के मुसलमानो की माशिअत और जेहनियत (उर्दू) (२०१८)
 • भारत के मुस्लिम विचारक (हिंदी) (२०१८)
 • भारतीय मुसलमान, हिंदुत्व आणि वास्तव (२००७)
 • भारतीय मुसलमानांची समाजरचना आणि मानसिकता (२०१२)[४]
 • भारतीय मुसलमानों की सामाजिक संरचना और मानसिकता (हिंदी) (१९९८)
 • मुस्लिम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद (२०१८)
 • सुफी संप्रदाय : वाङ्‌मय, विचार आणि कार्य (२०१६)
 • हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थ (२०१८)[५]

शोधनिबंध

[संपादन]
 • हिंदू-मुस्लिम राजकारण
 • हिंदू मुस्लिम सामाजिक सौहार्द
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 • महात्मा ज्योतिबा फुले
 • कार्ल मार्क्स
 • महात्मा गांधी
 • पंडित जवाहरलाल नेहरू
 • छत्रपती शाहू महाराज
 • वरील विषयांवर कर्नाटक विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, आदी विद्यापीठांत १५०हून अधिक  शोधनिबंध सादर

सामाजिक कार्य

[संपादन]
 • १९७० पासून मुस्लिम प्रबोधनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग
 • १९७० पासून मुस्लिम महिलांचे प्रश्न, हिंदू-मुस्लिम प्रश्न आणि राजकारण, जमातवाद, हिंदू-मुस्लिम सौहार्दाची समस्या, मुस्लिम मराठी सहित्य इत्यादी संबधी महाराष्ट्रातील अग्रणी वृत्तपत्रे, पाक्षिक, मासिक आणि साप्ताहिकात विपुल लेखन
 • जागतिकीकरण, सामाज्यवाद, अरब जग, आधुनिक भारताचे राजकारण इत्यादी राजकीय प्रश्नांवर विषयावर सातत्याने लेखन
 • मुस्लिम महिलांचे प्रश्न, हिंदू-मुस्लिम प्रश्न राजकारण, जमातवाद, हिंदू-मुस्लिम सौहार्दाची समस्या इत्यादी विषयावर महाराष्ट्रभर दौरे व भाषणे
 • दलित पॅंथरच्या स्थापनेपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात दलित पॅंथरच्या बरोबरीने दलित अत्याचारविरोधात लढा आणि चळवळीत सहभाग
 • दलित प्रश्नांवर सातत्याने लिखाण, डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक व राजकीय विचारांवर, महाराष्ट्रातील नियतकालिके, मासिके, साप्ताहिकांमधून लिखाण, सोलापूर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीच्या प्रसाराचे प्रयत्न
 • १९८४ पासून डॉ. असगरअली इंजिनिअर यांच्या समवेत ‘हिंदू-मुस्लिम एकता’ चळवळीसोबत काम
 • असगरअली इंजिनिअरसोबत सातारा, सांगली, इचलकरंजी, गुलबर्गा, लातूर येथे मेळावे आणि चर्चासत्रात सहभाग
 • लोकजीवन अकादमी, हुतात्मा अकादमी, समाजवादी प्रबोधिनीतर्फे चर्चासत्रांचे आयोजन
 • मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर ‘महाराष्ट्रीयन मुस्लिम अधिकार आंदोलना’ची सुरुवात
 • इतिहास पुनर्लेखन समितीचे गठन
 • १९९० साली मुस्लिम मराठी साहित्य परिषदेची स्थापना, संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष,
 • २००२ पर्यत मुस्लिम साहित्य परिषेदेकडून 7 मुस्लिम मराठी साहित्य संमेलने आयोजित
 • २००० नंतर मुस्लिम मराठी साहित्य परिषद बरखास्त
 • १९९२ साली मुस्लिम ओबीसी चळवळीची सुरुवात-संस्थापक
 • १९९४ पासून मुस्लिम ओबीसी चळवळीचा महाराष्ट्रभर प्रसार

स्थापना

[संपादन]
 • मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर (१९९०)
 • मुस्लिम ओबीसी आंदोलन (१९९२)  
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा
 • महाराष्ट्रीयन मुस्लिम अधिकार आंदोलन (२०१५)
 • इतिहास सशोधन परिषद

सन्मान

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]
 • छत्रपती शाहू महाराज पुरस्कार, कोल्हापूर

आगामी पुस्तके

[संपादन]
 • इस्लामी तत्त्वज्ञान आणि मुस्लिम (२०१९)
 • भारतीय मुसलमानांचे राजकारण (२०१९)
 • मुस्लिम मराठी साहित्य : एक दृष्टिक्षेप (२०१९)
 • मुस्लिम प्रश्न (२०१९)
 • राजकीय शोध निबंधावरील लेखसंग्रह (२०१९)
 • राष्ट्रवाद, सामाज्यवाद आणि इस्लाम (२०१९)

संदर्भ

[संपादन]
 1. ^ Makar, A. B.; McMartin, K. E.; Palese, M.; Tephly, T. R. "Formate assay in body fluids: application in methanol poisoning". Biochemical Medicine. 13 (2): 117–126. ISSN 0006-2944. PMID 1.
 2. ^ "Remembering Fakruddin H Bennur". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत). 53 (35). 2015-06-05.
 3. ^ "Books". www.bookganga.com. 2018-07-15 रोजी पाहिले.
 4. ^ "मुसलमानांकडे बोट दाखविणे हीच सध्याच्या काळाची आवश्यकता – डॉ. जहीर अली यांचे मत". Loksatta. 2013-03-16. 2018-05-23 रोजी पाहिले.
 5. ^ "Gandhi centre to have 12 more books on Mahatma - Indian Express". archive.indianexpress.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-15 रोजी पाहिले.