पोट्सडाम
पोट्सडाम Potsdam |
||
जर्मनीमधील शहर | ||
| ||
देश | जर्मनी | |
राज्य | ब्रांडेनबुर्ग | |
क्षेत्रफळ | १८७.३ चौ. किमी (७२.३ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | १,५८,९०२ | |
- घनता | ८४९ /चौ. किमी (२,२०० /चौ. मैल) | |
http://www.potsdam.de |
पोट्सडाम (जर्मन: Potsdam) ही जर्मनी देशाच्या ब्रांडेनबुर्ग राज्याची राजधानी आहे. पोट्सडाम शहर जर्मनीच्या ईशान्य भागात बर्लिनच्या नैऋत्येला २४ किमी अंतरावर हाफेल नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली पोट्सडामची लोकसंख्या सुमारे १.५९ लाख इतकी होती.
पोट्सडामला दैदिप्यमान इतिहास लाभला आहे. १९१८ सालापर्यंत पोट्सडाम येथे प्रशियन व जर्मन सम्राटांचे अधिकृत निवासस्थान असे. येथील अनेक राजवाडे व उद्यानांमुळे पोट्सडामला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत स्थान मिळाले आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर जर्मनीचे भवितव्य ठरवण्यासाठी भरवलेली पोट्सडाम परिषद येथेच घडली. पूर्व जर्मनीचा भाग असलेल्या पोट्सडामला पश्चिम बर्लिनपासून बर्लिनच्या भिंतीने अलग करण्यात आले होते. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पोट्सडाम ब्रांडेनबुर्ग राज्याची राजधानी बनले.
संदर्भ
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |