पाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पिण्याचे पाणी या पानावरून पुनर्निर्देशित)
पाण्याचा थेंब
नळाचे पाणी
बाटलीतील मिनरल वॉटर

पाणी (H2O) हे हायड्रोजनऑक्सिजन या अणूंपासून बनलेला पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव स्वरुपात असते. निसर्गात पाण्याची निर्मिती होत नाही. परंतु पाणी एका रूपातून दुसऱ्या रुपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रुपांतरीत होते. वाफेला थंडी लागताच त्याचे रुपांतर द्रवरुपात म्हणजे पाण्यात होते. पाणी ह्या विपुल प्रमाणात आढळते. पाणी हे बिनरंगाचे बिनवासाचे आणि चव नसलेले असते.जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार आहे. पाणी हे रंगहीन असून प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. पाण्याच्या घन स्वरुपाला बर्फ व वायुरुपाला वाफ असे संबोधतात. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे संबोधतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात साठ ते सत्तर टक्के पाणी असते. जे स्वस्थ आरोग्यासाठी चांगलं असते.पाणी हे जीवन आहे.

पाणी विषयक पुस्तके[संपादन]