भूजल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

भूजल म्हणजे जमिनीच्या पातळीखाली असलेले पाणी आहे.ते जमिनीखालील सछिद्र मातीत किंवा खडकांच्या भेगांत किंवा पातळीखालील एखाद्या पोकळीत असू शकते.अश्या साठ्यास जलधारक म्हणतात.यापासून वापरण्यायोग्य पाणी मिळू शकते.पाण्याची ती खोली ज्यावर मातीच्या छिद्रात,भेगात अथवा पोकळीत पाणी पूर्णपणे संपृक्त होते त्यास 'भूजलपातळी' (वॉटरटेबल) असे म्हणतात.याचे पावसाने व इतर कारणांनी जसे प्रवाह इत्यादी, पुनर्भरण होते. ते मग जमिनीच्या पातळीवर येउन वाहते. त्याच्या होणाऱ्या निचऱ्यास,त्याचा एकुण उतारा पाहून, त्यास झरा,पाझर,मरुवन किंवा दलदल असे म्हणतात.भूजल हे शेतीसाठी उद्योगासाठी किंवा नागरीकांना पिण्यासाठी वापरण्यात येते. या पाण्याचे नियोजनास/वितरणास/निचऱ्याच्या अभ्यासास भूजलशास्त्र असे म्हणतात.

भूजल शोधण्याची वराहमिहिराची प्राचिन पद्धत[संपादन]

प्राचिन काळी दुसऱ्या वराहमिहिराने याने एक ग्रंथ लिहिला. तो बृहत्संहिता म्हणून प्रसिद्ध आहे.त्यातील उदकार्गल या प्रकरणात,पाण्याच्या शोध घेण्याबद्दल माहिती आहे. त्यात त्याने अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे.कोणत्या वृक्षाशेजारी किती हातावर(प्राचिन काळचे, हाताची बोटे ते कोपर इतक्या लांबीचे,अंतर मोजण्याचे एकक) पाणी लागेल.विहिर खोदतांना,प्रथम कोणत्या प्रकारची,रंगाची माती लागेल,नंतर कोणता दगड लागेल इत्यादी वर्णने त्यात केली आहेत.पाण्यासाठी त्याचा भर औदुंबर वृक्षावर अधिक होता.त्याशेजारी गोडपाणी लागते असे त्याचे म्हणणे होते.[ संदर्भ हवा ]

जलचक्र[संपादन]

समुद्राच्या पाण्याचे अंतस्सारण[संपादन]

अतिउपसा[संपादन]

प्रदूषण[संपादन]