पाव भाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चविष्ट पाव भाजी

पाव भाजी हा एक महाराष्ट्रीय/मराठी खाद्यप्रकार आहे . महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ म्हणून पावभाजी प्रसिद्ध आहे. विशेषतः पुणे आणि मुंबई या शहरात प्रसिद्ध झालेला हा पदार्थ महाराष्ट्र राज्याच्या विविध प्रांतात प्रसिद्ध झाला.

इतिहास[संपादन]

अमेरिकेतील युद्धाच्या वेळी मुंबईतील कापड गिरणीतील कामगारांना अधिक वेळ काम करावे लागे.त्यांना अमेरिका येथे कापड पुरवठा करण्यासाठी सतत काम करावे लागत असे. या दरम्यान पोळी किंवा भाकरी ऐवजी पाव या पदार्थाचा वापर वाढला आणि पातळ भाजी किंवा आमटी याऐवजी वेगळ्या प्रकारची भाजी त्यांच्या आहाराचा भाग झाली असे मानले जाते.[१]

पावभाजी पद्धत-प्रकार[संपादन]

पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो,बटाटे, कांदा, लसूण आल्याची चटणी, तिखट, मसाले, तसेच ढोबळी मिरची, फूलकोबी, मटार ह्या भाज्यांचा देखील समावेश होतो.[२] पाव भाजीचे त्याच्या प्रकारावरून इतर नामकरण करण्याची देखील प्रथा आहे जसे भाज्या कुस्करून न घालता मोठ्या फोडींच्या स्वरूपात केल्या तर त्यास खडा-पावभाजी (खड्याप्रमाणे मोठ्या आकाराचे भाजीचे तुकडे)असे म्हणतात. तसेच भाजीत लोणी अधिक प्रमाणात वापरल्यास त्यास बटर/लोणी/मस्का(हिंदीत) पावभाजी, तसेच चिझ-पावभाजी, ड्रायफ्रुट (सुकामेवा)पावभाजी इ. असे प्रकार करण्यात येतात.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Hearty & heritage". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2021-04-18. 2021-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Pav Bhaji Recipe: पाव भाजी ललचाएगी सबका जी, बच्चे-बड़े सब कहेंगे-प्लीज थोड़ा और..." News18 India. 2021-05-15 रोजी पाहिले.