थ्यॅन षान

थ्यॅन षान (लेखनभेदः तियान शान, थ्यॅन शान; चिनी: 天山; फीनयीन: Tiān Shān ; मंगोलियन Тэнгэр уул; उय्गुर: تەڭرى تاغ ; अर्थ: दिव्य पर्वतरांगा) ही मध्य आशियातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. ७,४३९ मी. उंचीवरील चंगीश चोकुसू हे थ्यॅन षानमधील सर्वात उंच शिखर आहे.
थ्यॅन षान पर्वतरांग कझाकस्तान, किर्गिझस्तान व चीनच्या शिंच्यांग ह्या स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर पसरली आहे. हिच्या आग्नेयेस ताक्लामकान वाळवंट पसरले असून ही दक्षिणेस पामीर पर्वतरांगेस जोडली गेली आहे. तसेच हिचा एक भाग शिंच्यांग व पाकिस्तानच्या उत्तर भागातून हिंदुकुश पर्वतरांग पर्वतरांगेशी जोडला गेला आहे.
चित्रदालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- "थ्यॅन षान पर्वतरांगेविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत