पं. रमाबाई मेधावी डोंगरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पं. रमाबाई मेधावी डोंगरे
जन्म इ.स. २३ एप्रिल १८५८
गंगामूळ
मृत्यू इ.स. ५ एप्रिल १९२२
केडगाव
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
प्रसिद्ध कामे आर्य महिला समाज, शारदासदन, मुक्तिसदन, कृपासदन या संस्थेची स्थापना
धर्म ख्रिस्ती धर्म
जोडीदार बिपिन बिहारी मेधावी
अपत्ये मनोरमा
वडील अनंतशास्त्री डोंगरे
पुरस्कार 'कैसर ए-हिंद'


पं. रमाबाई मेधावी डोंगरे हे एकोणिसाव्या शतकातील स्वयंभू विलक्षण व्यक्तिमत्व होते. स्त्रीच्या कर्तुत्वाचा अपवादस्वरूपी आदर्श निर्माण केला.

व्यतिगत माहिती[संपादन]

पं. रमाबाईचा जन्म दक्षिण भारतात गंगामूळ येथे २३ एप्रिल १८५८ रोजी झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे संस्कृतीचे गाढे विद्वान होते.त्यांनी रमाबाईना लहानवयातच संस्कृत शिकवले. तीक्ष्ण बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती,वक्तृत्व, भाषेवर प्रभुत्व हे गुण रमाबाईनी वडिलांकडून मिळविले होते.वडिलांच्या मृत्यू नंतर भाऊ श्रीनिवास शास्त्री प्रवास करीत कलकत्याला गेले. नंतर इ.स. १८८० मध्ये रमाबाईनी बिपिन बिहारी मेधावी यांच्या बरोबर विवाह केला. त्यांना मनोरमा मुलगी झाली. आणि इ.स. ४ फेब्रुवारी १८८२ ला बिईपीन यांना मृत्यू झाला. नंतर त्या मुलीला घेऊन कलकत्याला आल्या. त्या पुराणांवर व्याख्याने देऊ लागल्या. अनेक पुराने त्यांना पाठ होती. पंडिता सरस्वती या पदव्या त्यांना कलकत्याला मिळाल्या. 'स्त्रियासाठी काही कार्य केले पाहिजे' हा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्वान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. ५०. आय.एस.बी.एन. 978-81-7425-310-1.