न्यायसहायक विज्ञान
न्यायसहायक विज्ञानशाखा ही पुराव्यांची वैज्ञानिक पद्धतीने तपासण्या करून न्यायदानात सत्यशोधनास मदत करणारी गुन्हे अन्वेषक शास्त्र शाखा आहे.
स्वरूप[संपादन]
निरनिराळ्या विज्ञान शाखांचे एकत्रीकरण करून ही बहुआयामी शाखा बनली आहे. येथे निरनिराळ्या शास्त्रशाखांतील शास्त्रज्ञ येतात. न्यायसहायक विज्ञानशाखेच्या प्रयोगशाळेत मानसोपचार तज्ज्ञ, विषतज्ज्ञ व रोगतज्ज्ञ तर असतातच, शिवाय हस्ताक्षरतज्ज्ञ, छायाचित्रकार व वर्णनावरून चित्र रेखाटणारे चित्रकारही असतात. प्रयोगशाळेत पुरावा उचलण्यासाठीही काही विशिष्ट चिमटे, कागद इत्यादी साधनांचा व रसायनांचा वापर करतात.
इतिहास[संपादन]
डॉ. एडमंड लोकार्ड या लियॉन्सच्या फ्रेंच डॉक्टरने इ.स. १९१० मध्ये पहिली न्यायसहायक विज्ञान प्रयोगशाळा स्थापन केली असे मानले जाते.
शाखा[संपादन]
- न्यायसहायक रसायनशास्त्र
- विधिरसायनशास्त्र
- न्यायवैद्यक
- न्यायसहायक रोगविज्ञान
- न्यायसहायक विकृतिशास्त्र (forensic pathology)
- न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा
- न्याय पंक्तिदर्शन (न्यायसहायक पंक्तिदर्शन) (splectroscopy)
भारतात शिक्षण[संपादन]
या शाखेत प्रशिक्षण घेण्यासाठी वैज्ञानिक शैक्षणाची पात्रता आवश्यक असते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आदी विज्ञान शाखेचे पदवीधर तसेच माहिती तंत्रज्ञान मानसोपचार, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्सनाही या क्षेत्रात मोठी मागणी आहे असे मानले जाते
भारतीय शैक्षणिक संस्था[संपादन]
- १) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अॅण्ड फोरेन्सिक सायन्स - एम्ए, एम्एस्सी
- २) सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई - सटिर्फिकेट अभ्यासक्रम
- ३) पुणे विद्यापीठ- डिप्लोमा इन क्रिमिनॉलॉजी
- ४) बुंदेलखंड विद्यापीठ, झांशी - फोरेन्सिक सायन्स (एम्एस्सी),
- ५) डॉ. हरिसिंग गौर विश्वविद्यालय - क्रिमिनॉलॉजी ॲन्ड फोरेन्सिक सायन्स (एम्एस्सी)
- ६) मद्रास विद्यापीठ - क्रिमिनॉलॉजी ॲन्ड क्रिमिनल जस्टिस (एम्ए), सायबर फोरेन्सिक्स ॲन्ड इन्फर्मेर्शन सिक्युरिटी (एम्एस्सी)
- ७) उस्मानिया विद्यापीठ - फोरेन्सिक सायन्स (एम्एस्सी)
- ८) गुजरात विद्यापीठ - फोरेन्सिक सायन्स (एम्एस्सी)
- ९) बी.आर. आंबेडकर विद्यापीठ , आग्रा - फोरेन्सिक सायन्स ((एम्एस्सी)
- १०) कर्नाटक विद्यापीठ , धारवाड - क्रिमिनॉलॉजी ॲन्ड फोरेन्सिक सायन्स (एम्ए)
- ११) म्हैसूर विद्यापीठ - क्रिमिनॉलॉजी ॲन्ड फोरेन्सिक सायन्स (एम्ए)
- १२) पंजाब विद्यापीठ - फोरेन्सिक सायन्स ((एम्एस्सी)
- १३) बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी - क्रिमिनॉलॉजी (एम्ए)
- १४) तिरूनेलवेली विद्यापीठ - क्रिमिनॉलॉजी ॲन्ड क्रिमिनल जस्टिस (एम्एस्सी)
- १५) फोरेन्सिक सायन्स विभाग, चेन्नई
16) Institute of forensic science Mumbai
प्रमुख संस्था[संपादन]
- राज्य सरकारअंतर्गत न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, मुंबई
- इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी)
- सीबीआय
- राज्य सरकारचे क्राइम सेल्स
सरकारी संस्थांमध्ये राज्य सेवा परीक्षा किंवा केंद्रीय सेवा परीक्षांमधून रुजू होता येते.
अधिक वाचन[संपादन]
- अनिल अग्रवाल लिखित आंतरजालावरील पाक्षिक[मृत दुवा] (भाषा:इंग्रजी)
बाह्य दुवे[संपादन]
- न्यायसहायक मानवमिति[मृत दुवा] (भाषा:इंग्रजी)
- न्यायसहायक विज्ञान संस्था, भारत (भाषा:इंग्रजी)
- भारतीय न्यायसहायक (भाषा:इंग्रजी)
- कोर्टाने अधिकृत केलेले भारतीय न्यायसहायक (भाषा:इंग्रजी)
- आंतरराष्ट्रीय न्यायसहायक संस्था (भाषा:इंग्रजी)
- न्यायसहायक शास्त्रज्ञ व शोधक (भाषा:इंग्रजी)
- न्यायसहायक विज्ञानाचा विदा (भाषा:इंग्रजी)
- अमेरिका येथील न्यायसहायक प्रयोगशाळा (भाषा:इंग्रजी)