निलगिरी प्रकारची फ्रिगेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निलगिरी प्रकारच्या फ्रिगेटा भारतीय नौदलातील लढाऊ फ्रिगेटा आहेत. यांची बांधणी रॉयल नेव्हीच्या लिॲंडर प्रकारच्या फ्रिगेटांवर आधारित आहे.

माझगांव डॉक लिमिटेडने इ.स. १९७२ ते इ.स. १९८१ दरम्यान या प्रकारच्या सहा फ्रिगेटा बांधल्या. २०१३नंतर या सगळ्या सेवानिवृत्त झाल्या. या नौकांना चौदाव्या फ्रिगेट स्क्वॉड्रनमध्ये शामिल करण्यात आले होते.

नौका[संपादन]

नाव क्रमांक सेवारत निवृत्ती नोंदी
आयएनएस निलगिरी F33 २३ जून, इ.स. १९७२ इ.स. १९९६ २४ एप्रिल, इ.स. १९९७ रोजी भारतीय आरमाराच्या सी हॅरियर विमानातून सोडलेल्या सी ईगल प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या चाचणीत समुदरसृप्यंतु.
आयएनएस हिमगिरी F34 २३ नोव्हेंबर, इ.स. १९७४ ६ मे, इ.स. २००५ बंदराला न येता सर्वाधिक दिवस समुद्रात राहणारी या वर्गातील फ्रिगेट.
आयएनएस उदयगिरी F35 १८ फेब्रुवारी, इ.स. १९७६ २४ ऑगस्ट, इ.स. २००७[१]
आयएनएस दुनागिरी F36 ५ मे, इ.स. १९७७ २० ऑक्टोबर, इ.स. २०१०
आयएनएस तारागिरी F41 १६ मे, इ.स. १९८० २७ जून, इ.स. २०१३ या वर्गातील निवृत्त होणारी शेवटची फ्रिगेट.
आयएनएस विंध्यगिरी F42 ८ जुलै, इ.स. १९८१ १४ जून, इ.स. २०१२[२]
(३० जानेवारी, २०११ ते १५ फेब्रुवारी, २०११ दरम्यान पाण्यात बुडलेल्या अवस्थेत)
३० जानेवारी, २०११ रोजी ही नौका एमव्ही नॉर्ड लेक या सामानवाहू नौकेला धडकली. त्यात लागलेल्या आगीनंतर विंध्यगिरी एकही हताहत न होती मुंबई बंदरात बुडाली. १५ फेब्रुवारी रोजी तिला पुन्हा तरंगती करून १४ जूनला सर्व सन्मानांसह तिला निवृत्त करण्यात आले.
  1. ^ "32 years glorious service". 26 September 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Списан злополучный индийский фрегат F-42 Vindhyagiri" (रशियन भाषेत). 14 June 2012. 26 September 2014 रोजी पाहिले.