आयएनएस निलगिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आयएनएस निलगिरी ही भारतीय आरमाराची फ्रिगेट होती. ही नौका भारतात शून्यापासून बांधण्यात आलेली पहिली मोठी युद्धनौका होती. हिची बांधणी माझगांव डॉक्स येथे यारो शिपबिल्डर्सच्या सहयोगाने करण्यात आली. निलगिरी वर्गाच्या फ्रिगेटांपैकी ही पहिली फ्रिगेट होती.

ही नौका बांधताना आलेल्या अनुभवामुळे माझगांव गोदीने नंतरच्या आयएनएस विंध्यगिरी आणि आयएनएस तारागिरीच्या रचनेत बदल करून त्यांवर सी किंग हेलिकॉप्टर, आयएलएस ३२४ टॉर्पेडो आणि बोफोर्स एएसडब्ल्यू रॉकेट प्रक्षेपक घातले.

३ जून, इ.स. १९७२ रोजी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झालेली ही नौका १९९६मध्ये निवृत्त करण्यात आली. २४ एप्रिल, १९९७ रोजी सी हॅरियर विमानातून सोडलेल्या सी ईगल प्रक्षेपणास्त्राच्या चाचणीत निलगिरी समुद्रसृप्यंतु झाली.