Jump to content

नाताळ केक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नाताळ केक

नाताळ केक हा नाताळ सणाच्या वेळी केला जाणारा गोड पदार्थ आहे.[]

स्वरूप

[संपादन]

नातलग सणासाठी केला जाणारा केक हा तांदूळ, काळ्या मनुका, बेदाणे यांच्यापासून केला जातो. रम नावाच्या पेयामध्ये मनुका आणि बेदाणे भिजवून ठेवले जातात आणि नंतर त्यांचा वापर केकमध्ये केला जातो. या केकवर आयसिंगने सजावट केली जाते, त्यामुळे त्याची रुची वाढते तसेच घर, नाताळ वृक्ष, सांताक्लॉज अशी सजावटही त्यावर केली जाते.[]

वैविध्य

[संपादन]

इंग्लंडमधील पारंपरिक नाताळ केक हा बेदाणेमनुका यांच्या अधिक वापरातून केला जातो. रम नावाच्या मद्यामधे ही फळे भिजवून ठेवली जातात आणि या द्रव्यात मुरलेली ही फळे वापरून केक तयार केला जातो. प्लम केक हा ही वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. त्यावर आयसिंगची सजावट केली जाते.[]

स्काॅटलंड मधील केकमधे व्हिस्की नावाच्या मद्याचा वापर केला जातो. यामध्ये बेदाणे, मनुका यांसह चेरीचा वापरही होतो. युनायटेड किंग्डम येथे केल्या जाणाऱ्या केकला स्विस रोल असे म्हणले जाते आणि त्यात चाॅकलेटचा वापर केलेला असतो. योकशायर येथे इतर फळे घातलेल्या केकप्रमाणे नाताळ केक केला जातो आणि तो चीजसहही खाल्ला जातो.

इंग्लिश फ्रूटकेक

अन्य देशात

[संपादन]
नाताळ सणानिमित्त केक
भारत-

भारतात सहसा फळांचा वापर करून नाताळसाठी केक तयार होतात. पारंपरिक बेकरी उत्पादक त्यामधे रम या मद्याचा वापर करतात. आयसिंग आणि शोभेच्या वस्तूंनी केक सजविला जातो.

श्रीलंका-

येथील नाताळ केकमधे रूचि वाढविण्यासाठी जायफळ आणि दालचिनी पूड केक तयार करताना वापरली जाते.[] काळी मिरी पूडही यासाठी वापरली जाते.

जपान- जपानमधे नाताळच्या संध्याकाळी हा केक खाल्ला जातो.हा साधा स्पाँज पद्धतीचा केक असून त्यावर फेटलेले क्रीम आणि स्ट्राॅबेरी वापरली जाते. त्यावर चॉकलेट आणि त्या मोसमात उपलब्ध फळे सजावटीसाठी वापरली जातात. सांताक्लाॅजचे चित्रही केकवर दिसून येते.[]

फ्रान्स, बेल्जियम, कॅनडा येथील नाताळ केकही वैशिष्ट्यपूर्ण असतात. हे मुळात साधे स्पाँज केक असले तरी चाॅकोलेट, काॅफी याच्या क्रिमसह मिश्रणाला केकवर पसरवून त्याची रूची वाढविली जाते.एकवर एक याप्रमाणे केक आणि क्रीम यांचे थर दिले जातात आणि थंडीच्या मोसमात पडणाऱ्या बर्फाचे प्रतीक म्हणून त्यावर पिठीसाखर भुरभुरवली जाते.[][]

हे ही पहा

[संपादन]

नाताळ

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b PRAMANIK, TANAY. THE CHRISTMAS CAKE : Delicious Homemade Cookbook Recipes (इंग्रजी भाषेत). TANAY PRAMANIK.
  2. ^ Howard, Emily (2014-11-17). Easy & Delicious Christmas Cakes & Puddings (इंग्रजी भाषेत). Rishabh Rationalist.
  3. ^ Lawson, Nigella (2011-09-30). Nigella Christmas: Food, Family, Friends, Festivities (इंग्रजी भाषेत). Random House. ISBN 978-1-4464-1257-2.
  4. ^ Gunawardena, Charles A. (2005). Encyclopedia of Sri Lanka (इंग्रजी भाषेत). Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 978-1-932705-48-5.
  5. ^ Takemaru, Naoko (2010-04-19). Women in the Language and Society of Japan: The Linguistic Roots of Bias (इंग्रजी भाषेत). McFarland. ISBN 978-0-7864-5610-9.
  6. ^ Gisslen, Wayne (2012-01-17). Professional Baking (इंग्रजी भाषेत). John Wiley & Sons. ISBN 978-1-118-08374-1.