Jump to content

सांता क्लॉज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांता क्लॉजाच्या वेषातील माणूस

सांता क्लॉज (मराठी नामभेद: सँटा क्लॉज ; इंग्लिश: Santa Claus) हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक पात्र आहे. सांता क्लॉजाचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे.[] सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा ख्रिश्चन लोकांमधे समज आहे.[] जगभरातील लहान मुलांचे सांताक्लॉज हे अनोखे आणि आवडते पात्र आहे. बालमनावर सांता क्लॉजच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाची छाप पडलेली आहे.[] पाश्चिमात्य देशात विशेषतः युरोपात आणि भारतातही हा नाताळ हा सण उत्साहाने साजरा केला जातो. सुमारे महिनाभर आधीपासून या सणानिमित्त आयोजन सुरू होते.

संकल्पना

[संपादन]

सांता क्लॉज हा सेंट निकोलस, क्रिस क्रीनगल, नाताळ बाबा किंवा नुसताच संता अशा विविध नावांनी ओळखला जातो. चौथ्या शतकातील ग्रीक धर्मगुरू संत निकोलस हे भक्तांना भेटवस्तू देत असत. त्यांच्यापासूनच सांता क्लॉज या संकल्पनेचा आधुनिक काळात उगम झाला असावा, असे मानले जाते.[] ब्रिटिश आणि डच संस्कृतींमध्ये उदयाला आलेली "सांता क्लॉज" जी संकल्पनाही तेथूनच आलेली असावी. नाताळचा उगम प्राचीन पगान संस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचत असल्याने पगानच्या हिवाळी सणाशीही सांताचे नाते मानले जाते. इसवी सन १ ८ २ २ मध्ये लेखक क्लेमंट क्लर्क मूर यांनी आपल्या मुलांच्या मनोरंजनासाठी एक गीत लिहिले. त्यात त्य्यांनी लहान मुलांना भेटवस्तू देत असलेल्या संत निकोलस यांचे चित्रण केले . या कवितेला लोकप्रियता प्राप्त झाली . यामध्ये सांता ही व्यक्तिरेखा उत्साही , आनंद देणारी आहे असे वर्णन केले आहे जे आजही पहावयास मिळते .[]

वर्णन

[संपादन]
मिरवणुकीत सांताक्लॉज

सांता क्लॉज ही व्यक्तिरेखा लाल रंगाचा आणि पांढरा फरचा पोशाख घालते. त्याला पांढरी लांब दाढी असते. वयस्कर रूपातील या व्यक्तीने काही वेळेला चष्मा लावलेला असतो. पायात काळे बूट कमरेला काळा पट्टा, हातात किंवा पाठीवर खाऊ आणि खेळणी यांनी भरलेली मोठी कापडी पिशवी असे याचे रूप असते.[] १९व्या शतकात अमेरिका आणि कॅनडा मध्ये सांता क्लॉजचे हे विशिष्ट रूप अधिक लोकप्रिय झाले.[]

इतिहास आणि विकास

[संपादन]
फ्रान्स मधील सांता क्लॉज
  • मायरा येथील इसवी सनाच्या चौथ्या शतकातील ग्रीक ख्रिस्ती बिशप सेंट निकोलस हे गोर-गरिबांना भेटवस्तू वाटप करीत असत आणि त्यांच्या या कार्यासाठी ख्रिस्ती धर्मात ते विशेष प्रसिद्ध आहेत.[] त्यांनी आयुष्यभर समर्पित भावाने ख्रिस्ती धर्माचे कार्य केले.[]

मध्ययुगात त्यांच्या स्मरणार्थ ६ डिसेंबर या दिवशी लहान मुलांना भेटवस्तू देण्याची प्रथा सुरू झाली. ही प्रथा नंतरच्या काळातही सुरूच राहिली फक्त संत निकोलस यांच्या ऐवजी सांता क्लॉज असे नाव झाले आणि मुलांना भेटवस्तू देण्यासाठी नाताळची पूर्वसंध्या हा दिवस निवडला गेला.[१०]

  • सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये 'नाताळबाबा'(Father Christmas) या नावाने नवी संकल्पना पुढे आली. पुनरुत्थान, आनंद, शांती, उत्तम प्रतीचे अन्न घेऊन येणारा, हिरव्या रंगाच्याच फरच्या कपड्यांनी सजलेला हा शांतिदूत ख्रिस्ती धर्मात लोकप्रिय झाला.[११]
  • नेदरलँड्स आणि बेल्जियम या देशांत सिंटरक्लास (Sinterklaas) या नावाला महत्त्व आहे. या ठिकाणीही लहान मुलांना भेटवस्तू देणारी व्यक्ती म्हणूनच याची ओळख आहे.[१२]
सिंटरक्लास

संत निकोलस आणि नाताळ बाबा (Father Christmas) या दोन संकल्पनांचे एकीकरण होऊन त्यातून सांताक्लॉज ही व्यक्तिरेखा प्रचारात आली आहे असे मानले जाते.

  • १९ व्या शतकात-सांताक्लॉजच्या व्यक्तिरेखेला विविध नव्या संकल्पना जोडल्या गेल्या. यामध्ये बर्फ़ाच्या घसरत्या गाडीचे चित्रण, त्या गाडीला लावलेली रेनडिअर नावाची हरणे अशा गोष्टी जोडल्या गेल्या.पाश्चात्य जगातील लेखक, व्यंगचित्रकार यांनी या व्यक्तिरेखेला नवनव्या गोष्टी जोडल्या ज्या आजही लहान मुलांच्या भावविश्वात महत्त्वाच्या ठरतात.

लहान मुलांसाठी आकर्षण

[संपादन]

थॉमस नास्त नावाच्या लेखकाने सांताक्लॉजचे घर ही नवी संकल्पना मांडली. उत्तर ध्रुवाच्या बर्फ़ाळ प्रदेशात सांताक्लॉजचे निवासस्थान आहे.[१३] जगभरातील हजारो मुले सांताक्लॉजला त्याच्या घरच्या पत्त्यावर पत्रे पाठवीत असतात.[१४] आणि नाताळच्या रात्री बर्फ़ावरून घसरत आपल्या गाडीवरून तो मुलांना भेटण्यासाठी आणि भेटवस्तू देण्यासाठी येतो ही कल्पना लहान मुलांच्या कथा, गाणी यामधून अधिक लोकप्रिय झाली. आपल्या हातातील घंटा वाजवत, मेरी ख्रिसमस अशा नाताळच्या शुभेच्छा देत सांताक्लॉज येतो अशी काल्पनिक धारणा आहे.[१५] सांताक्लॉज या विषयावरील विविध पुस्तकेही लेखकांनी लिहिलेली आहेत.[१६][१७] आपल्या निवासस्थानातून सांताक्लॉज एक आकाशवाणी केंद्रही चालवितो.[१८] चित्रपट, मालिका याद्वारेही लहान मुलांसाठी सांताक्लॉज व्यक्तीरेखेचे चित्रण केले जाते.[१९]

हे ही पहा

[संपादन]

सांताक्लॉजचे प्रसिद्ध गीत

[संपादन]
Jingle Bells (Calm) (Kevin MacLeod) (ISRC USUAN1100188)

नाताळ शुभेच्छा ध्वनी

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Christmas 2021: जानिए कौन हैं सांता क्लॉज, क्रिसमस पर बच्चों को क्यों देते हैं गिफ्ट". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2021-12-24 रोजी पाहिले.
  2. ^ Bowler, Gerry (2011-07-27). Santa Claus: A Biography (इंग्रजी भाषेत). McClelland & Stewart. ISBN 9781551996080.
  3. ^ Frazee, Marla (2005). Santa Claus: The World's Number One Toy Expert (इंग्रजी भाषेत). Houghton Mifflin Harcourt. ISBN 0152049703.
  4. ^ "Christmas Day 2021 : निकोलस कैसे बने सांता क्लॉस, पढ़ें ये कथा, जानें इस दिन घर के बाहर जुराबे क्यों सुखाते हैं बच्चे?". Hindustan (hindi भाषेत). 2021-12-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "9 People Who Shaped Christmas". Mental Floss (इंग्रजी भाषेत). 2021-09-12. 2024-12-06 रोजी पाहिले.
  6. ^ author/online-lokmat (2024-12-06). "कसा दिसायचा खराखुरा सांताक्लॉज? जुन्या टेक्निकने १७०० वर्षांपूर्वीचा चेहरा बनवला, हुबेहूब..." Lokmat. 2024-12-06 रोजी पाहिले.
  7. ^ Howard, Vicky (2005-08). The Book of Santa Claus (इंग्रजी भाषेत). Andrews McMeel Publishing. ISBN 9780740754753. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "Saint Nicholas Biography (c. 280–343)". https://www.biography.com. 14.12.2019 रोजी पाहिले. line feed character in |title= at position 25 (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  9. ^ "St. Nicholas, Santa Claus & Father Christmas". https://www.whychristmas.com. 14. 12.2019 रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  10. ^ Schottky, Martin (2004). Herrscherchronologien der antiken Welt. Stuttgart: J.B. Metzler. pp. 310–339. ISBN 9783476019127.
  11. ^ McCrossen, Alexis; Marling, Karal Ann (2002-03). "Merry Christmas! Celebrating America's Greatest Holiday". The Journal of American History. 88 (4): 1606. doi:10.2307/2700743. ISSN 0021-8723. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ lmoore@mlive.com, Lindsay Moore | (2024-11-07). "Hear the history of Sinterklaas and other Netherlands traditions at 'Koffie Kletz'". mlive (इंग्रजी भाषेत). 2024-12-06 रोजी पाहिले.
  13. ^ lmoore@mlive.com, Lindsay Moore | (2024-11-07). "Hear the history of Sinterklaas and other Netherlands traditions at 'Koffie Kletz'". mlive (इंग्रजी भाषेत). 2024-12-06 रोजी पाहिले.
  14. ^ "Santa Clause Village".
  15. ^ Jeremy., Seal, (2005). Nicholas : the epic journey from saint to Santa Claus (1st U.S. ed ed.). New York: Bloomsbury Pub. ISBN 1582344191. OCLC 60321400.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: extra text (link)
  16. ^ Perkes, Alden (2017-11-08). The Santa Claus Book (इंग्रजी भाषेत). Stonewell Press. ISBN 9781627301091.
  17. ^ Perkes, Alden (2017-11-08). The Santa Claus Book (इंग्रजी भाषेत). Stonewell Press. ISBN 9781627301091.
  18. ^ "The official radio station of Santa Claus".
  19. ^ "Best Santa Claus Movies of All Time".