Jump to content

नलिनी जयवंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नलिनी जयवंत
जन्म १८ फेब्रुवारी १९२६
बॉम्बे, बॉम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश इंडिया
मृत्यू २२ डिसेंबर, २०१० (वय ८४)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९४१ ते १९६५, १९८३
भाषा हिंदी
पती
वीरेंद्र देसाई
(ल. १९४५; घ. १९४८)
,
प्रभू दयाल
(ल. १९६०; मृ. २००१)

नलिनी जयवंत (१८ फेब्रुवारी, १९२६:मुंबई, महाराष्ट्र, भारत - २२ डिसेंबर, २०१०:चेंबूर, मुंबई) या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. बॉलीवूडच्या कृष्ण-धवल काळातील १९४० आणि १९५० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटांत प्रामुख्याने काम केले.[१]

नलिनी जयवंत यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. मराठी/हिंदी चित्रपट अभिनेत्री रतन बाई या नलिनीच्या आत्या होत्या. रतन बाईची मुलगी अभिनेत्री शोभना समर्थ असून, शोभनाच्या मुली नूतन आणि तनुजा या आहेत.[२] इ.स. १९८३ मध्ये त्यांनी नास्तिक या हिंदी चित्रपटात शेवटचे काम केले होते. तेव्हा पासून नलिनी मुख्यतः एकाकी जीवन जगत होत्या.[३][४]

जयवंत यांचा विवाह १९४५ मध्ये दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्याशी झाला होता. इ.स. १९४८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये अभिनेते प्रभु दयाल यांच्याशी लग्न केले. या जोडप्याने त्याकाळी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले होते.[५]

मृत्यू

[संपादन]

जयवंत यांचे २२ डिसेंबर, २०१० रोजी, वयाच्या ८४ व्या वर्षी, युनियन पार्क, चेंबूर, मुंबई येथे त्यांच्या ६० वर्षांच्या बंगल्यावर निधन झाले . तिच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर रुग्णवाहिकेने तिचा मृतदेह घेऊन जाईपर्यंत तिचा मृत्यू कोणाच्याही लक्षात आला नाही. जयवंतच्या शेजाऱ्यांनी सांगितले की तिने स्वतःला समाजापासून वेगळे केले आहे आणि २००१ मध्ये दयालच्या मृत्यूनंतर ती लोकांना भेटत नव्हती. तिचे नातेवाईक देखील तिच्याशी बराच काळ संपर्कात नव्हते.[६]

नलिनी वरील चित्रित काही गाणी

[संपादन]

तो काळ हिंदी चित्रपट सृष्टीतील सुमधुर गाण्यांचा असल्याने नलिनी जयवंत वर चित्रित केलेली काही प्रसिद्ध गाणी पुढील प्रमाणे आहेत.

  • ठंडी हवाएं लहरा के आएं...(नौजवान);
  • नजर लगी राजा तोहरे बंगले पे...(काला पानी);
  • तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार...(नास्तिक);
  • हाए जिया रोए...(मिलन);
  • गिन गिन तारे मैं हार गई रात को...(जादू);
  • हाय जिया रोये पिया नही आए...(मिलन);
  • जि़न्दगी भर गम जुदाई का...(मिस बॉम्बे);
  • बुझ गए आशा के दिए बदले रंग जहां के...(शिकस्त);
  • ओ जाने वाले राही इक पल रुक जाना...(राही);
  • कहां ले चले हो बता दो मुसाफिर...(दुर्गेश नन्दिनी);
  • ओ माटी के पुतले इतनाना कर गुमान...(शेरू)
  • जीवन के सफर में राही, मिलते हैं बिछड़ जाने को...(मुनीम जी) इत्यादी.[७]

चित्रपट सूची

[संपादन]
नलिनी जयवंत यांचे चित्रपट
वर्षचित्रपटसहकलाकारदिग्दर्शकपुरस्कार/नोंद
१९४१बहेनशेख मुख्तारमेहबूब खान
१९४१निर्दोषमुकेशव्ही.सी. देसाई
१९४१राधिकाहरीशके. मुन्शी
१९४२आंख मिचौलीसत्यजितआर.एस. चौधरी
१९४३अदाब अर्झकरण दिवाणव्ही.सी. देसाई
१९४६फिर भी अपना हैकरण दिवाणए.पी. कपूर
१९४८अनोखा प्यारदिलीप कुमार, नर्गिसएम.आय. धरमसी
१९४८गुंजनत्रिलोक कपूरव्ही.सी. देसाई
१९५०आंखेशेखर, भारत भूषणदेवेंद्र गोयल
१९५०मुकद्दरसाजिदअर्विन कुमार
१९५०समाधीअशोक कुमाररमेश सहगल
१९५०संग्रामअशोक कुमारज्ञान मुखर्जी
१९५१एक नजररहमानओ.पी. दत्ता
१९५१जादूसुरेशए.आर. कारदार
१९५१नंदकिशोरभारत भूषणव्ही.व्ही. देसाई
१९५१नौजवानप्रेमनाथमहेश कौल
१९५२दो राहशेखरबी.आर. चोप्रा
१९५२जलपरीअशोक कुमारकिदार शर्मा
१९५२काफिलाअशोक कुमारअर्विन कुमार
१९५२नौदोबाराहअशोक कुमारअमिया चक्रवर्ती
१९५२राहीदेव आनंदख्वाजा अहमद अब्बास
१९५२सलोनीअशोक कुमारजे.पी. अडवाणी
१९५३शिकस्तदिलीप कुमाररमेश सहगल
१९५४बाप बेटीरंजनबिमल रॉय
१९५४कवीभारत भूषणदेबकी बोस
१९५४लकीरेअशोक कुमारहरबन्स सिंग
१९५४मेहबूबाशम्मी कपूरके. अमरनाथ
१९५४नाझअशोक कुमारएस.के. ओझा
१९५४नास्तिकअजितआय.एस. जोहर
१९५५चिंगारीनूतन, नासिर खानएस.पी. बक्षी
१९५५मुनीमजीदेव आनंदसुबोध मुखर्जी
१९५५राजकन्याशम्मी कपूरके. अमरनाथ
१९५५रेल्वे प्लॅटफॉर्मसुनील दत्तरमेश सहगल
१९५६२६ जानेवारी १९५०अजितरमेश सहगल
१९५६आन बानअजितआर. ठाकूर
१९५६आवाजराजेन्द्र कुमारमेहुल कुमार
१९५६दुर्गेश नंदिनीअजितबी. मित्रा
१९५६फिफ्टी फिफ्टीदेव आनंदएम. सरोया
१९५६हम सब चोर हैंशम्मी कपूरआय.एस. जोहर
१९५६इन्साफअजितजे.एल. मल्होत्रा
१९५७कितना बदल गया इंसानअजितआय.एस. जोहर
१९५७मिस बॉम्बेअजितकेदार शर्मा
१९५७मिस्टर एक्सअशोक कुमारनन्दनलाल जसवंतलाल
१९५७नीलमणीअशोक कुमारजी.पी. सिप्पी
१९५७राणी रुपमतीभारत भूषणएस.एन. त्रिपाठी
१९५७शेरूअशोक कुमारशक्ति सामंत
१९५८काला पानीदेव आनंद, मधुबालाराज खोसलाफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
१९५८मिलनअजितआर. ठाकूर
१९५९माँ के आंसूअजितधिरुभाई देसाई
१९६०मुक्तीअजितनानाभाई भट्ट
१९६१अमर रहे ये प्यारराजेन्द्र कुमारप्रभू दयाल
१९६१सेनापतीपृथ्वीराज कपूरकिदार शर्मा
१९६२गर्ल्स हॉस्टेलअजितरविंद्र दवे
१९६२जिंदगी और हमअशोक कुमारआनंद कुमार
१९६३तुफान में प्यार कहांअशोक कुमारफनी मजुमदार
१९६५बॉम्बे रेस कोर्सअजितकेदार कपूर
१९८३नास्तिकअमिताभ बच्चनप्रमोद चक्रवर्ती

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Nalini Jaywant". Upperstall. 2019-02-18 रोजी पाहिले.
  2. ↑ "नलिनी जयवंत". २५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ↑ Rediff On The NeT, Movies: Down memory lane with Shobhana Samarth[permanent dead link]
  4. ↑ Nalini Jaywant profile
  5. ↑ The Tribune, Chandigarh, India - Ludhiana Stories
  6. ↑ "Actress Nalini Jaywant's 'death' shrouded in mystery".
  7. ↑ "बोल्ड एवं ब्यूटीफुल अभिनेत्री थी नलिनी जयवंत". dainiktribuneonline.com. 2021-06-09 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.