Jump to content

नंदिनी सत्पथी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नंदिनी सतपथी या पानावरून पुनर्निर्देशित)
Nandini Satpathy (it); নন্দিনী শতপতি (bn); Nandini Satpathy (hu); Nandini Satpathy (yo); Nandini Satpathy (cy); നന്ദിനി സത്പതി (ml); Nandini Satpathy (ast); Nandini Satpathy (ca); नंदिनी सत्पथी (mr); Nandini Satpathy (de); ନନ୍ଦିନୀ ଶତପଥୀ (or); Nandini Satpathy (ga); Nandini Satpathy (fr); Nandini Satpathy (fi); Nandini Satpathy (da); Nandini Satpathy (sl); نندنی ستپاتھی (ur); నందిని సత్పతీ (te); Nandini Satpathy (sv); ناندينى ساتپاثى (arz); Nandini Satpathy (nn); Nandini Satpathy (nb); Nandini Satpathy (nl); ᱱᱚᱱᱫᱤᱱᱤ ᱥᱚᱛᱯᱚᱛᱷᱤ (sat); नंदिनी सत्पथी (hi); ನಂದಿನಿ ಸತ್ಪತಿ (kn); ਨੰਦਿਨੀ ਸਤਪਥੀ (pa); Nandini Satpathy (en); Nandini Satpathy (sq); Nandini Satpathy (es); நந்தினி சத்பதி (ta) femme politique (fr); भारतीय राजनीतिज्ञ (hi); intialainen poliitikko ja kirjailija (fi); ލިޔުންތެރިއެއް (dv); ഒറീസ്സയിലെ മുൻ മുഖ്യമന്ത്രിയും പ്രമുഖ സാഹിത്യകാരിയും (ml); Indiaas politica (1931-2006) (nl); indische Politikerin und Autorin (de); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ᱳᱰᱤᱥᱟ, ᱥᱤᱧᱚᱛ ᱨᱤᱱᱤᱡ ᱨᱟᱡᱽᱟᱹᱨᱤ ᱦᱚᱲ (᱑᱙᱓᱑-᱒᱐᱐᱖) (sat); ଓଡ଼ିଆ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); politician from Odisha, India (1931-2006) (en); نویسنده و سیاست‌مدار هندی (fa); भारतीय राजकारणी (mr); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag) Satpathy (de)
नंदिनी सत्पथी 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावନନ୍ଦିନୀ ଶତପଥୀ
जन्म तारीखजून ९, इ.स. १९३१
कटक
मृत्यू तारीखऑगस्ट ४, इ.स. २००६
भुवनेश्वर
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • Ravenshaw University
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • राज्यसभा सदस्य
  • ओडिशाचे मुख्यमंत्री (इ.स. १९७२ – इ.स. १९७३)
  • Member of the Eleventh Odisha Legislative Assembly (इ.स. १९९५ – इ.स. २०००)
  • Member of the Tenth Odisha Legislative Assembly (इ.स. १९९० – इ.स. १९९५)
  • Member of the Ninth Odisha Legislative Assembly (इ.स. १९८५ – इ.स. १९९०)
  • Member of the Eighth Odisha Legislative Assembly (इ.स. १९८० – इ.स. १९८५)
  • Member of the Seventh Odisha Legislative Assembly (इ.स. १९७७ – इ.स. १९८०)
  • Member of the Sixth Odisha Legislative Assembly (इ.स. १९७४ – इ.स. १९७७)
  • ओडिशाचे मुख्यमंत्री (इ.स. १९७३ – इ.स. १९७६)
  • Member of the Fifth Odisha Legislative Assembly (इ.स. १९७२ – इ.स. १९७३)
मातृभाषा
वडील
  • Kalindi Charan Panigrahi
अपत्य
वैवाहिक जोडीदार
  • Devendra Satpathy
पुरस्कार
  • Sahitya Akademi Translation Prize (इ.स. १९९५)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

नंदिनी सत्पथी (९ जून १९३१ – ४ ऑगस्ट २००६) ह्या भारतीय राजकारणी आणि लेखक होत्या. जून १९७२ ते डिसेंबर १९७६ पर्यंत त्या ओडिशाच्या मुख्यमंत्री होत्या.

प्रारंभिक जीवन

[संपादन]

नंदिनी सत्पथी यांचा जन्म ९ जून १९३१ रोजी कालिंदी चरण पाणिग्रही आणि रत्नमणी पाणिग्रही यांच्या पोटी तटीय पुरीच्या ब्राह्मण कुटुंबात झाला होता परंतु त्या कटक येथील पिठापूर येथे वाढल्या होत्या. [] सत्पथीचे काका भगवती चरण पाणिग्रही यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ओडिशा शाखेची स्थापना केली. ते नेताजी बोस यांचे निकटचे सहकारी होते.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

१९३९ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी त्यांना ब्रिटिश पोलिसांनी युनियन जॅक खाली खेचल्याबद्दल आणि कटकच्या भिंतींवर ब्रिटिश राजविरोधी पोस्टर चिकटवल्याबद्दल बेदम मारहाण केली. त्याचीच त्यावेळी सर्वत्र चर्चा झाली होती आणि ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आग ओतण्याचे काम केले होते.

रेवेनशॉ कॉलेजमध्ये ओडिया भाषेमध्ये मास्टर ऑफ आर्ट्सचे शिक्षण घेत असताना, त्या कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थी संघटनेत सामील झाल्या. १९५१ मध्ये, महाविद्यालयीन शिक्षणाच्या वाढत्या खर्चाविरोधात ओडिशात विद्यार्थी आंदोलन सुरू झाले, ज्याच्या त्या नेत्या होत्या. पोलिस दलाने आंदोलकांवर हल्ला केला आणि त्यात नंदिनी सत्पथी गंभीर जखमी झाल्या. इतर अनेकांसह त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात त्यांची भेट देवेंद्र सत्पथीशी झाली जे स्टुडंट फेडरेशनचे आणखी एक सदस्य होते व नंतर त्यांचे पती.

१९६२ मध्ये ओरिसात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते; १४० सदस्यांच्या ओरिसा राज्य विधानसभेत काँग्रेस पक्षाचे ८० पेक्षा जास्त सदस्य होते. राष्ट्रीय स्तरावर भारतीय संसदेत अधिकाधिक महिला प्रतिनिधी याव्यात यासाठी चळवळ सुरू होती. विधानसभेने नंदिनी सत्पथी यांची राज्यसभे निवड केली, जिथे त्यांनी दोन वेळा काम केले. १९६६ मध्ये इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान झाल्यानंतर, सत्पथी पंतप्रधानांशी संलग्न मंत्री बनल्या व माहिती आणि प्रसारण मंत्रालयात होत्या.

बिजू पटनायक आणि इतरांनी काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे रिक्त झालेल्या पदांमुळे १९७२ मध्ये सत्पथी ओडिशात परतल्या आणि ओडिशाच्या मुख्यमंत्री झाल्या. [] [] सत्पथी यांनी डिसेंबर १९७६ मध्ये पद सोडले [] १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान, त्या जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या गटाचा भाग होत्या जो मे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाला. जून १९७७ मध्ये ढेंकनाल येथून ओरिसा विधानसभेवर त्या निवडून आल्या [] १९८० मध्ये, त्यांनी काँग्रेस (उर्स) उमेदवार म्हणून ती जागा जिंकली आणि १९८५ मध्ये अपक्ष म्हणून. १९९० मध्ये त्यांचा मुलगा तथागत सत्पथी यांनी जनता दलाचे उमेदवार म्हणून ढेंकनाल विधानसभेची जागा जिंकली.

राजीव गांधींच्या विनंतीवरून सत्पथी १९८९ मध्ये काँग्रेस पक्षात परतल्या. [] त्यांनी २००० ची निवडणूक लढवली नाही व राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

न्यायालयीन खटला

[संपादन]

१९७७ मध्ये, सत्पथी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आणि त्या वेळी लागू असलेल्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संभाव्य उल्लंघनाबाबत पोलिस तपास सुरू झाला. तपासादरम्यान त्यांनी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार दिला; व त्यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की भारतीय राज्यघटनेच्या कलम २० (३) ने त्यांना सक्तीच्या आत्म-गुन्हेगारीपासून संरक्षण दिले आहे; जे कोर्टाने मान्य केले. पुढील १८ वर्षांत सत्पथीने त्यांच्याविरुद्धचे सर्व खटले जिंकले.[]

साहित्यिक कारकीर्द

[संपादन]

सत्पथी ह्या ओडिया भाषेतील लेखीका होत्या व त्यांचे काम इतर अनेक भाषांमध्ये अनुवादित आणि प्रकाशित झाले आहे. ओडिया साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना १९९८ चा साहित्य भारती सन्मान पुरस्कार मिळाला. [] [] तस्लिमा नसरीन यांच्या लज्जाचे उडियामध्ये भाषांतर हे त्यांचे शेवटचे प्रमुख साहित्यिक काम होते.[]

मृत्यू

[संपादन]

४ ऑगस्ट २००६ रोजी त्यांच्या भुवनेश्वर येथील घरी त्यांचे निधन झाले. [१०]

कुटुंब

[संपादन]

दोन मुलांपैकी तिचा धाकटा मुलगा तथागत सत्पथी बिजू जनता दलाचे ४ वेळा खासदार होते आणि दैनिक वृत्तपत्र (धरित्री आणि ओरिसापोस्ट)चे संपादक होते.[११][१२][१३]

वारसा

[संपादन]

९ जून, सत्पथी यांचा वाढदिवस, हा राष्ट्रीय कन्या दिन – नंदिनी दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.[१४][१५]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ Cultural Heritage of [Orissa]: Dhenkanal (इंग्रजी भाषेत). State Level Vyasakabi Fakir Mohan Smruti Samsad. 2002. ISBN 978-81-902761-5-3.
  2. ^ a b "Number 13 is lucky for Mamata Banerjee". NDTV. 14 May 2011. 9 May 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "The 'Iron lady' of Odisha politics | news.outlookindia.com". news.outlookindia.com. 2012. 22 February 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 July 2012 रोजी पाहिले. Satpathy's differences with the party high command widened as she criticised the Emergency
  4. ^ "Orissa Assembly Election Results in 1977".
  5. ^ "Public Representatives | Dhenkanal District : Odisha | India".
  6. ^ Nandini Satpathy v.
  7. ^ "Spotlight". Tribune India. 9 February 1999. 10 May 2012 रोजी पाहिले. Eminent writer and former Chief Minister Nandini Satpathy has won the prestigious Sahitya Bharati Samman Award, 1998, for her outstanding contribution to Oriya literature
  8. ^ "StreeShakti – The Parallel Force". streeshakti.com. 2012. 10 May 2012 रोजी पाहिले. she was awarded the Sahitya Bharati Samman for her contributions to Oriya literature
  9. ^ Sahu, Nandini (14 October 2007). "The Position of Women in Oriya Literature". boloji.com. 11 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 May 2012 रोजी पाहिले. Her last major work was the translation of Taslima Nasreen's 'Lajja' into Oriya
  10. ^ "Nandini Satpathy". odisha360.com. 2012. 10 May 2012 रोजी पाहिले. Smt. Nandini Satpathy died of an illness on 4th August 2006 at her residence in Bhubaneswar.
  11. ^ "Biographical Sketch of Member of 12th Lok Sabha". parliamentofindia.nic.in. 2001. 10 May 2012 रोजी पाहिले. Election Result of Dhenkanal Lok Sabha Constituency
  12. ^ "Tathagata Satpathy(BJD):Constituency- Dhenkanal(ORISSA) – Affidavit Information of Candidate". myneta.info. 2012. 10 May 2012 रोजी पाहिले. Tathagata Satpathy – BJD – Dhenkanal (ORISSA)
  13. ^ "Oriya News Paper Dharitri | Dharitri Newspaper | Dharitri ePaper | Chhutidina". incredibleorissa.com. 2012. 10 May 2012 रोजी पाहिले. This oriya paper first started by late Nandini Satpathy and now running by her son Sri Tathagata Satapathy
  14. ^ "Fair day declared". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 2019-09-22 रोजी पाहिले.
  15. ^ Pioneer, The. "National Daughters' Day on June 8". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 2019-09-22 रोजी पाहिले.