धामणी (संगमेश्वर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?धामणी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर संगमेश्वर
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. या गावात श्रीलक्ष्मीकेशवाचे प्राचीन देवालय आहे. कोकण आयुर फार्मा प्रा.ली. हा आयुर्वेदीय प्रकल्प याच गावात आहे. सीएनजी गॕस स्टेशन व दोन पेट्रोलपंप इथे उपलब्ध आहे. श्री.देवी वाघजाई , श्री. बाजीबुवा मंदिर ही क वर्ग ग्रामीण यात्रास्थळ आहेत. श्री. वरदायिनी मंदिर व लगतचा धबधबा प्रेक्षणीय आहे. बडदवाडी गणेश मंदिर हे देवालय जुनं आहे. वाघजाई मंदिरालगत देवराई जैवविविधतेचे माहेरघर आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

श्री लक्ष्मीकेशव मंदिर व श्री देवी वाघजाई मंदिर ही ग्रामीण यात्रा स्थळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत.

नागरी सुविधा[संपादन]

लॉज, हॉटेल, पेट्रोलपंप, सीएनजी स्टेशन, मेडिकल स्टोअर

जवळपासची गावे[संपादन]

गोळवली, संगमेश्वर, कसबा

संदर्भ[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/