Jump to content

द गेटवे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण आशियातील जगभर उच्चतम सेवा देणारी ही हॉटेल शृंखला आहे. टाटा उद्योगसमूह मधील द इंडियन हॉटेल्स लिमिटेड हे या हॉटेलचे मालक आहेत.[]

इतिहास

[संपादन]

भारत देशाचे मुंबई शहरात सन १९०३ मध्ये ताज हॉटेल्स रिसॉर्टस आणि पॅलेस हे नाव धारण कंरून टाटा ग्रुपने पहिले द ताज महाल पॅलेस हॉटेल चालू केले.[] तेव्हापासून ते आताच्या २१ व्या शतकापर्यंत ताज ग्रुपने भारतात आणि भारत बाहेर कित्येक हॉटेल्स चालू केली आहेत. १२ ऑक्टोबर २००६ रोजी ताज ग्रुपने इंडियन रिसॉर्टस हॉटेल लिमिटेड,गेटवे हॉटेल्स अँड गेटवे रिसॉर्टस लिमिटेड, कुटीरम् रेसोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड,एशिया पॅसिफिक हॉटेल्स लिमिटेड आणि ताज लॅंड्स एंड लिमिटेड या हॉटेलचे एकत्रीकरण केले.[] सन २००८ मध्ये ताज हॉटेल्स रिसॉर्टस आणि पॅलेसचे नवीन ब्रँड नाव “द गेटवे हॉटेल” केले. कित्येक अस्तीत्वात असणाऱ्या हॉटेल मालमत्ता या नवीन ब्रँड नावामध्ये स्थलांतरित केल्या आणि कित्येक या विभागात वाढविल्या.

हॉटेल

[संपादन]

नोव्हेंबर 2015 अखेर दक्षिण आशिया मध्ये अगदी शांत अशा २८ शहरात ही हॉटेल आहेत.[] या हॉटेलच्या ४० मालमत्ता आहेत. त्यांची ठिकाणे आणि इतर माहिती खालील प्रमाणे आहे.

देश राज्य शहर हॉटेलचे नाव
भारत आंध्र प्रदेश विजयवाडा द गेटवे हॉटेल एम.जी.रोड
विशाखापट्टणम बीच रोड
छत्तीसगड रायपूर जी. इ.रोड
अहमदाबाद उममेड
जुनागड गैर फॉरेस्ट
गुजरात सूरत आठवलीनेस
बडोदा आकोटा गार्डन्स
हरयाणा गुरगाव दमदम तलाव
कर्नाटक बंगलोर रेसिडंशी रोड
चिकमगलूर के.एम.रोड
हुबळी लेक साईड
मंगलोर ओल्ड फोर्ट रोड
केरळ कालिकत बीच रोड
एर्नाकुलम मरीन ड्राइव्ह
वरकला जनार्धनपूर
महाराष्ट्र नासिक आंबड
गोंदिया बाळाघाट रोड
पुणे हिंजवडी
राजस्थान जयपुर रंगड लॉज
जैसलमेर रावळकोट
जोधपुर जोधपुर
तमिळनाडू चेन्नई आय टी एक्सप्रेस वे
कूनूर चर्च रोड
मदुराई पासूमलाई
उत्तर प्रदेश आगरा फतेहबाद
वाराणशी गंगेज
पश्चिम बंगाल कोलकता इ.एम.बायपास
श्रीलंका कोलंबो एयरपोर्ट बगिचा

सुविधा

[संपादन]

वायफाय, २४ तास स्वागत कक्ष, वातानुकूलित, एलसीडी, टीवी,बार, रेस्टोरंट, कॅफे, खोली सेवा, इंटरनेट, व्यवसाय केंद्र, पूल,जिम, कॉफी शॉप, सर्व सुविधासह सभा ग्रह, दरबार हॉल, फॅक्स, झेरॉक्स,स्पा, मुलांच्यासाठी पूल, बुटी सलून, इंडोर खेळ, पोहण्याचा तलाव, मुलांना खेळण्यासाठी जागा, खरेदी केंद्र, पाण्यातील खेळ, प्रवाशी मार्गदर्शक, भाड्याच्या कार, शरीर स्वास्थ्य, चलन बदल, धोबी, विवाह सेवा, फुलांचे दुकान इ, सुविधा आहेत.

खोली

[संपादन]

उच्चत्तम प्रतीच्या, सर्व सुविधांनी युक्त, वातानुकूलित, आवश्यकतेनुसार आकारमानाच्या, विशेष, दर्शनीय जागा मनोरंजक, नजरेत भरतील अशा कलाकृती, व वरील सर्व सुविधा असणाऱ्या खोल्या आहेत.[]

राकेश सरना हे या हॉटेलचे सीईओ आहेत. याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.[]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "वार्षिक अहवाल" (PDF).
  2. ^ "ताज हॉटेल्सचा इतिहास".[permanent dead link]
  3. ^ "आमचे हॉटेल्स ब्रांड - ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पैलेस".[permanent dead link]
  4. ^ "ताज हॉटेल आणि त्यांची ठिकाणे".
  5. ^ "ताज गेटवे हॉटेलच्या बद्दल".
  6. ^ "द गेटवे हॉटेल्स आणि रिसॉर्टसचे मुख्य कार्यालयचे ठिकाण".[permanent dead link]