दौंड−मनमाड रेल्वेमार्ग
Jump to navigation
Jump to search
दौंड मनमाड रेल्वेमार्ग |
---|
दौंड मनमाड रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील रेल्वेमार्ग आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील दौंड शहरास मुंबई कोलकाता रेल्वेमार्गावरील मनमाड शहरास जोडतो. हा मार्ग एकपदरी असून याचे विद्युतीकरण झालेले नाही. या मार्गावर डीझेल इंजिने वापरुन रेल्वेगाड्या येजा करतात. अहमदनगर, विसापूर, पुणतांबे, येवला, कोपरगांव ही या मार्गावरील काही मोठी शहरे आहेत.