दुर्गाबाई देशमुख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दुर्गाबाई देशमुख
दुर्गाबाई चिंतामणराव देशमुख
जन्म नाव दुर्गाबाई चिंतामणराव देशमुख
टोपणनाव जॉन ऑफ़ ओर्क
जन्म १५ जुलै १९०९
काकीनाडा, आंध्र प्रदेश, भारत
मृत्यू ९ मे १९८१
हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत
शिक्षण एम. ए. (वकील)
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र समाज सेवा, शिक्षक,स्वातंत्र सेनानी
भाषा तेलुगु,हिंदी,इंग्रजी
चळवळ मिठाचा सत्याग्रह
वडील श्री बीवीएन रामाराव
आई कृष्णवेनम्मा
पती सी. डी. देशमुख
पुरस्कार नेहरु साक्षरता पुरस्कार,पॉलजी हाफ़मैन पुरस्कार,यूनेस्को पुरस्कार, जीवन पुरस्कार, जगदीश पुरस्कार, पद्म विभूषण-१९७५
Durgabai deshmukh

दुर्गाबाई देशमुख (जुलै १५, १९०९ - मे ९, १९८१) स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. रिझर्व बँकेचे तिसरे गर्व्हनर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्त मंत्री चिंतामणराव देशमुख हे त्यांचे पती होते.[१]

जीवन[संपादन]

दुर्गाबाई यांचा जन्म १९०९ मध्ये आंध्र प्रदेशातील राजमुंदरी जिल्हातील काकीनाडा या गावी झाला. दुर्गाबाईचा वयाच्या 8व्या वर्षी सुब्बाराव यांच्याशी विवाह झाला. पण परिपक्व झाल्यानंतर दुर्गाबाईनी एकत्र राहण्यास नकार दिला. आणि त्यांच्या वडिलांनी आणि भावाने त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. व पुढील शिक्षणासाठी बाहेर पडल्या. आई श्रीमती कृष्णवेन्मा आणि वडील श्री. बीवीएन.रामराव होते. लहानपणापासूनच मातृत्व, देशभक्ती आणि समाजसेवा या मूल्यांवर दुर्गाबाईंच्या मनावर परिणाम झाला होता.[२] १९५३ मध्ये त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री चिंतामण देशमुख यांच्याशी वयाच्या ४४व्या वर्षी विवाह केला. दुर्गाबाई यांनी द स्टोन यू स्पीकेथ नावाचे पुस्तक लिहिले. १९८१ मध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यांचे निधन नरसानापेता श्रीकाकुलम जिल्ह्यात झाले.[३]


शिक्षण[संपादन]

दुर्गाबाईंच्या बालपण काळात मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. पण दुर्गाबाईना शिकण्याची खूप आवड होती. त्यांनी आपल्या शेजारच्या एका शिक्षकाबरोबर हिंदीचा अभ्यास सुरू केला. त्या काळात हिंदीचा प्रसार हा राष्ट्रीय चळवळीचा एक भाग होता. दुर्गाबाईंनी लवकरच हिंदी भाषेत अशी योग्यता प्राप्त केली आणि १९२३ मध्ये त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. या प्रयत्नाचे कौतुक करून गांधीजींनी दुर्गाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविले. १९५३ मध्ये दुर्गाबाई यांनी मध्यवर्ती समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.[४]

तुरुंग वनवास[संपादन]

दुर्गाबाईंनी प्रख्यात नेते टी. प्रकाश यांच्या बरोबर त्यांनी मीठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. २५ मे १९३० रोजी दुर्गाबाईंना अटक करण्यात आली आणि एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. बाहेर येताच दुर्गाबाईंनी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पुन्हा त्यांना अटक केली गेली आणि तीन वर्षांची तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगाच्या या काळात दुर्गाबाईंनी इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढवले.[५]

महत्वपूर्ण योगदान[संपादन]

आंध्र महिला सभा, विद्यापीठ महिला संघ, नारी निकेतन अशा विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीसाठी दुर्गाबाई यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन आयोगाने प्रकाशित केलेले ‘एनसायक्लोपीडिया ऑफ सोशल सर्व्हिस इन इंडिया’ तयार केले गेले. आंध्र मधील खेड्या गावामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार देण्यात आला. त्यांनी बरीच शाळा, रुग्णालये, नर्सिंग शाळा आणि तांत्रिक शाळा स्थापन केली. तसेच अंधांसाठी शाळा, वसतिगृहे आणि तांत्रिक प्रशिक्षण केंद्रेही त्यांनी उघडली.[६]


महिला वकील[संपादन]

तुरुंगातून आल्यानंतर दुर्गाबाईंनी मद्रास विद्यापीठात नियमित अभ्यास सुरू केला. एम.ए. च्या परीक्षेत त्यांना पाच पदके मिळाली. तिथूनच त्यांना कायद्याची पदवी मिळाली आणि १९४२ मध्ये दुर्गाबाईंनी सराव सुरू केला. खुनाच्या प्रकरणात युक्तिवाद करणारी ती पहिली महिला वकील होती.[७]

पुरस्कार[संपादन]

 1. पॉल जी हॉफ़मैन पुरस्कार
 2. नेहरू साक्षरता पुरस्कार
 3. यूनेस्को पुरस्कार
 4. पद्म विभूषण पुरस्कार
 5. जीवन पुरस्कार आणि जगदीश पुरस्कार[८]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
 1. ^ अव्यक्त. "दुर्गाबाई देशमुख : अपने ‘बाल-विवाह’ को तोड़कर जो आजादी के आंदोलन की दिग्गज नेता बनीं". Satyagrah (hi-IN मजकूर). 2019-11-12 रोजी पाहिले. 
 2. ^ Mali, Rajkumar (2018-09-27). "दुर्गाबाई देशमुख की जीवनी | Durgabai Deshmukh Biography in Hindi". Biography Hindi (en-US मजकूर). 2019-11-12 रोजी पाहिले. 
 3. ^ "दुर्गाबाई देशमुख की जीवनी durgabai deshmukh biography in hindi". mehtvta (en-US मजकूर). 2019-03-17. 2019-11-12 रोजी पाहिले. 
 4. ^ eBiography. "दुर्गाबाई देशमुख जीवनी - Biography of Durgabai Deshamukh in Hindi Jivani". https//jivani.org (en मजकूर). 2019-11-12 रोजी पाहिले. 
 5. ^ "Durgabai Deshmukh Biography in Hindi - दुर्गाबाई देशमुख की लघु जीवनी". Hindi Vidya (en-US मजकूर). 2017-09-12. 2019-11-12 रोजी पाहिले. 
 6. ^ "दुर्गाबाई देशमुख - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर". bharatdiscovery.org. 2019-11-12 रोजी पाहिले. 
 7. ^ Kratika (2018-10-31). "दुर्गाबाई देशमुख: जो सिर्फ़ महिला नहीं, बल्कि नारी-शक्ति की वो मिसाल है जिसे भूल पाना मुश्किल है". ScoopWhoop Hindi (English मजकूर). 2019-11-12 रोजी पाहिले. 
 8. ^ "दुर्गाबाई देशमुख: संविधान के निर्माण में उठाई थी स्त्रियों के लिए सम्पत्ति के अधिकार की आवाज़!". The Better India - Hindi (hi-IN मजकूर). 2019-04-09. 2019-11-12 रोजी पाहिले.