दालन:मंदिर/मंदिर शैली/1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चालुक्य शिल्पस्थापत्य शैली ही इ.स.च्या ६ व्याइ.स.च्या १२ व्या शतकांदरम्यान अस्तित्वात असलेल्या चालुक्य साम्राज्यात प्रचलित असलेली स्थापत्यशैली होती.

चालुक्य शिल्पस्थापत्य शैलीची देवालये उंच जोत्याची असतात. ९ ते १० फूट जोते ठेणयाचा प्रघातही या पध्दतीत होता. ही देवालये सामान्यपणे चौथर्यावर उभारली जातात. देवालयाची स्थापत्य रचना तारकाकृती किंवा अष्टभद्र आराखड्यावर असधारीत असते. देवालयाचा छज्जा सरळ, जाड आणि रुंद ठेवण्याची पध्दती असते. चालुक्य शिल्पस्थापत्य कलापरंपरेत अनेक वैशिष्ट्ये आढळतात. या प्रकारच्या देवालयातील द्वारपट्टीका विशेषरीत्या अलंकारीक असतात. कलशपात्राची शिल्परचना तिथे असते. उंबरठ्यावर किर्तीमुख असते. देवालयातील शिल्परचनेत अष्टदिक्पाल, सप्तमातृका शिल्प आदिंचा समावेश असतो. समचतुष्कोनाकृती भौमितीक आकृत्यादेखील अनेक देवळातून आढळतात.

उत्तर चालुक्य कलेचे टप्पे नांदेड, लातूर, उस्मानाबाद या दक्षिण मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दिसून येतात. या भागातील मंदिरे स्थापत्यदृष्ट्या उत्तर कर्नाटकातील मंदिरांशी मिळतीजुळती आहेत. त्यातील आकृतीशिल्पे स्तंभांच्या खांबांवर आणि मंडोवरावर असतात. महाकाय प्रतिहारमूर्ती गर्भगृहाच्या द्वाराच्या दुतर्फा आणि मूर्तीशिल्पे मंडपाच्या किंवा गर्भगृहाच्या बाह्यांगावर आढळतात. तुलापट आणि खांब यांना जोडणारी आधारशिल्पेही या मंदिरांमध्ये..