तुळजापूर तालुका
?तुळजापूर तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मोठे शहर | तुळजापुर |
जवळचे शहर | धाराशिव(उस्मानाबाद) |
विभाग | मराठवाडा |
जिल्हा | उस्मानाबाद |
भाषा | मराठी |
विधानसभा मतदारसंघ | तुळजापुर विधानसभा मतदारसंघ |
तहसील | तुळजापूर तालुका |
पंचायत समिती | तुळजापूर तालुका |
कोड • आरटीओ कोड |
• MH 25 |
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.
येथे तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे.
तुळजा भवानी मंदिर
[संपादन]महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून ४२ कि.मी. तर उस्मानाबादहून २२ कि.मी. अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची ही देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अदी नावानी ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. आश्विन व चैत्र पूर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात.[१]
तालुक्यातील गावे
[संपादन]आलियाबाद अमृतवाडी (तुळजापूर) आंदूर आपसिंगा आरळी बुद्रुक आरळी खुर्द आरबाळी बाभळगाव (तुळजापूर) बारूळ बसवंतवाडी भातांब्री बिजनवाडी बोळेगाव बोरगाव (तुळजापूर) बोरी (तुळजापूर) बोरनाडवाडी चव्हाणवाडी (तुळजापूर) चिकुंद्रा चिंचोळी (तुळजापूर) चिवरी दहिटणा दहीवाडी देवकुरळी देवसिंगा देवसिंगा नाळ धानेगाव धनगरवाडी (तुळजापूर) ढेकरी धोत्री दिंडेगाव फुलवाडी (तुळजापूर) गांजेवाडी गवळेवाडी (तुळजापूर) घांडोरा घाट्टेवाडी गोंधळवाडी गुजणूर गुलहळ्ळी हगलूर हंगरगा (तुळजापूर) हिप्परगताड होनाळा होरटी इंदिरानगर (तुळजापूर) इटकळ जाळकोट जाळकोटवाडी जवळगा मेसाई कदमवाडी (तुळजापूर) काकरांबा काकरांबावाडी काळेगाव (तुळजापूर) कामठा (तुळजापूर) कार्ला (तुळजापूर) कासई काटगाव काटी (तुळजापूर) काटरी (तुळजापूर) केमवाडी केरूर केशेगाव खडकी (तुळजापूर) खानापूर (तुळजापूर) खंडाळा (तुळजापूर) खुडावाडी खुट्टेवाडी किळज कोरेवाडी कुंभारी (तुळजापूर) कुणसावळी लोहगाव (तुळजापूर) माळुंब्रा मानेवाडी (तुळजापूर) मंगरूळ (तुळजापूर) मानमोडी (तुळजापूर) मासळा खुर्द (तुळजापूर) मोरडा मुरटा नळदुर्ग (तुळजापूर) नांदगाव (तुळजापूर) नांदुरी निळेगाव पांगरदरवाडी पिंपळा बुद्रुक पिंपळा खुर्द रायखेळ रामतीर्थ (तुळजापूर) सालगारादिवटी सालगारातातुर सांगवीकाटी सांगवीमारदी सारटी (तुळजापूर) सरडेवाडी (तुळजापूर) सारोळा (तुळजापूर) सावरगाव शहापूर (तुळजापूर) शिरढोण (तुळजापूर) शिरगापूर शिवाजीनगर (तुळजापूर) शिवकरवाडी सिंदफळ सिंदगाव सुरतगाव ताडवळा तामलवाडी तेलारनगर तीर्थ बुद्रुक तीर्थ खुर्द तुळजापूर उमरगा (तुळजापूर) वडाचातांडा वडगावदेव वडगावकाटी वडगावलाख वागदरी (तुळजापूर) वाणेगाव (तुळजापूर) वाणेवाडी (तुळजापूर) यमगरवाडी (तुळजापूर) येडोळा येवती (तुळजापूर)
तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट
[संपादन]• सिंदफळ • काक्रंबा • मंगरूळ • काटी साचा:काटी*काटगाव • अणदूर • जळकोट • नंदगाव • शहापूर चिवरी