सावरगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सावरगाव हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील छोटे गाव आहे. येथील ग्रामदेवता असेल्या नागनाथची यात्रा येथे नागपंचमीला भरते. नागपंचमी दरम्यान नाग, पाल व विंचू हे एकमेकाचे शत्रू तब्बल पाच दिवस नागठाण्यातील दगडाच्या सपित वास्तव्य करतात. निसर्गाचा हा अनोखा करिष्मा या यात्रेदरम्यान दरवर्षी पाहायला मिळतो. अवघ्या महाराष्ट्रातून भक्तांचा लोंढा सावरगावी धावतो. पाच दिवस विविध पारंपारिक कार्यक्रम तथा विधी पार पडतात. नागपंचमीदिवशी सायंकाळी ३ च्या सुमारास "खरग्या" व पालखी सोहळा संपूर्ण गावातून मिरवला जातो. पूर्वी कालिदास मामा लिंगफोडे,शंकरराव पाटील, बाबुराव पाटील ही मंडळी यात्रेची शोभा वाढवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे. आज राजकुमार पाटील, संतोष बोबडे, रामेश्वर तोडकरी तथा रमेश काटगावकर, प्रा.कानिफनाथ माळी आदी या संस्कृतीचा वारसा पुढे चालवत आहेत.