तांडेसामू चालो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तांडेसामू चालो (tandesamu chalo) ही बंजारा तांड्याची एक सामाजिक चळवळ असूून तांड्याला गतिमान करणारे ते एक शाश्वत तांडावादी विचार आहे. जागतिकीकरणातही जन्माची नाळ कायम टिकवून ठेवणारा एक चिरंतन असा तांडाभिमुख विचार होय. बंजारा गोरमाटी भाषेतील या शब्दाचा मराठीत 'तांडयाकडे चला' असा शब्दशः अर्थ होत असून प्रख्यात विचारवंत एकनाथराव पवार नायक या संकल्पनेचे आद्य प्रवर्तक मानले जातात.[१] बंजारा समाजाच्या वस्तीस्थानास तांडा असे म्हणतात. साधारणपणे या वसाहती कमीतकमी दोनशे ते जास्तीत जास्त तीन हजार लोकसंख्ये पर्यंत असतात.

१९१६ मध्ये ग्रामीण भागातील समृद्धीला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी महात्मा गांधीजीनी 'खेड्याकडे चला' अशी जी हाक दिली होती, तिचे काही अंशतः साम्यता यात दिसून येते.[२] परंतु मुख्य गावकुसापासून दूर असलेल्या आणि आपली स्वतंत्र ओळख आणि संस्कृती जपलेल्या वाडी तांड्याना या चळवळीचा फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे १४ सप्टेंबर २०१६ पासून बंजारा समाजातील तरुणांनी सर्जनशील विचारवंत एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली तथा समाजातील जेष्ठ व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली या स्वतंत्र चळवळीची सुरुवात झाली.[१][३]

गाव आणि तांडा सबलीकरणाच्या या स्वतंत्र चळवळीमध्ये तब्बल शंभर वर्षाचा फरक असून शाश्वत तांडा सबलीकरणाची प्रक्रिया देखील साहजिकच उशिरा सुरू झाली.गावखेडी आणि तांडा हे ग्रामीण समाज जीवनाचे अंग जरी असले, तरी मात्र तांडा हे गावगाडया पेक्षा पुर्णतः भिन्न आहेत. तांडा प्रश्न, तांडा संस्कृती, तांडा आव्हाने आणि तांडा जीवन हे तांडयाचे वेगळेपण दर्शवितात.तथापि 'तांडेसामू चालो'('तांडयाकडे चला')ही संकल्पना स्वतंत्र व व्यापक आहे. शाश्वत तांडा विकासासाठी ही चळवळ उपयुक्त ठरणारी असून मान्यवरांचे याविषयीचे काही गौरवोद्गार आहे. "तांडेसामू चालो' ही एक लोकोत्तर संकल्पना आहे."[४] असे बंजारा धर्मगुरू संत रामराव महाराज यांनी गौरवोद्गार काढले होते. तर तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले कि, "भटक्या विमुक्तांना त्यांच्यामधील अभिनव कौशल्य आणि जिज्ञासा दाखवून वैचारिक विकास घडवून आणण्याचे काम 'तांडेसामू चालो'द्वारे होत आहे." बंजारा साहित्य सोबतच मराठी साहित्यामध्ये देखील 'तांडेसामू चालो' या लोकोत्तर विचाराचा उल्लेख होतांना दिसून येतो.[५]


'तांडेसामू चालो' ही एक सर्जननशील तांडावादी विचारधारा असून तांडा सक्षमीकरणासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका या विचारप्रवाहाने निभावली आहे. [६]'खेेडयाकडेे चला' आणि 'तांडेसामू चालो' या दोन्ही संकल्पना , विचारधारा स्वतंत्र दृष्टीची असून स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहे. कारण गाव-खेडे आणि तांडा यात फार मोठ्या प्रमाणावर भिन्नता असते. तांडा संस्कृती देखील गावापेक्षा भिन्न असते. उपराजधानी नागपुरातील ग्रामीण तांडा मधून या चळवळीस सुरुवात झाली. ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंजारा समाजाच्या वसाहतीला तांडा असे म्हणतात. याच तांडयाच्या सक्षमीकरणासाठी प्रेरीत करणारी एक अभिनव संकल्पना म्हणून 'तांडेसामू चालो' या संकल्पनेकडे बघितल्या जाते. वंचिताचा समग्र पुनरूत्थानाचा हा शाश्वत विचारप्रवाह तांडा जीवनात सर्जनशील विचारवंंत एकनाथ पवार नायक यांनी रूजवले. शाश्वत तांडा सक्षमीकरणासाठी चालना देण्यात हा विचारप्रवाह महत्वपूर्ण ठरत आहे.

विधानपरिषदेत 'तांडेसामू चालो'[संपादन]

तांडा स्थैर्य व सबलीकरणासाठी थोर समाजसुधारक, हरितक्रांतीचे जनक , महानायक वसंतराव नाईक आणि जलसंधारणाचे जनक, माजी राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचा मोलाचा योगदान मानला जातो. तांडयाची व्यथा कवी आत्माराम राठोड ऊर्फ डॅनियल राणा यांनी आपल्या तांडा या कादंबरीतून पुढे आणली. परंतु आजच्या जागतिकीकरणात तांडा प्रकर्षाने पुढे यावा, या हेतूने वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतून प्रख्यात विचारवंत एकनाथजी पवार यांनी थेट तांडा अभियानास सुरुवात केली. यातूनच 'स्मार्ट तांडा-ग्लोबल तांडा' हे व्हिजन घेऊन तांडा जागरास सुरुवात केली. पुढे सन २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात या अभिनव संकल्पनेचा विशेष उल्लेखही झाला. शिवाय विदर्भ व मराठवाडा मधिल काही आमदारांनी 'तांडेसामू चालो' , 'कुठे नेऊन ठेवलाय आमचा तांडा' अशी निदर्शने देत नागपूर येथील अधिवेशनात विधानभवन परिसरात आंदोलन सुद्धा केले होते. त्यात आमदार हरिभाऊ राठोड, आमदार अमर राजूरकर, आमदार डॉ. डी. पी. सावंत आणि आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा प्रामुख्याने समावेश होता. ''तांडेसामू चालो'' म्हणून शासन-प्रशासनाला दखल घेण्यासाठी आवाज उठविला. याच दरम्यान तांडा विकासाचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सोपविण्यात आला. तेंव्हा पासून "तांडेसामू चालो" ही संकल्पना प्रकर्षाने जनमाणसासमोर आली. पुढे शासनाने दखल घेत पहिल्यांदाच तांडा विकासासाठी भरीव निधी देण्याचा निर्णय घेतला. १०१ ते १५० लोकसंख्याच्या तांडा विकासासाठी ६ लक्ष रुपये तर १५१ व त्यापेेक्षा अधिक लोकसंख्येच्या तांंडयासाठी १० लक्ष रुपयांची भरीव तरतूद झाली.[७]

'तांडेसामू चालो' : पुरोगामी जागराची लोकचळवळ[संपादन]

"आजच्या जागतिकीकरणात सुद्धा जन्माची नाळ तांडा सोबत टिकून राहावी. तांडा शिक्षित व्हावा-सक्षम व्हावा. संविधानाच्या कलमानेही साक्षर व्हावा. तांडा उद्यमशील व्हावा. शिवाय काळाप्रमाणे तो टेक्नोसेव्ही व्हावा." असे आधुनिक तांडावादी विचार या संकल्पनेचे प्रवर्तक एकनाथ पवारांनी विविध माध्यमातून नव्या पिढीत पेरण्यास सुरुवात केली. "चांदा ते बांदा" स्वाक्षरी मोहीम राबवून यात तांडा विकासासाठी भरीव उपाययोजना करणे. आणि 'नॅशनल तांडा डेव्हलपमेंट बोर्ड' स्थापन करणे, या विषयाचा समावेश केला गेला. तांड्यातील अंधश्रद्धेचे प्रमाण कमी करून चिकित्सक पिढी घडवून आणणे. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. पायाभूत सुविधेसह वाचन समृद्धी रुजविण्यासाठी प्रेरित करणे. बंजारन महिलेचे सक्षमीकरण करणे तसेच तांडा उदयमशिलतेची कास धरणे. संविधानिक मूल्यांची ओळख करून देणे, अशा विविध तांडाभिमुख कृतीचा यात समावेश असून विशेष म्हणजे बंजारा-गोरमाटी भाषेतून हा तांडा जागर केला जातो. जोपर्यंत तांडयाकडे पाऊले फिरकणार नाही ; तोपर्यंत तांडयाचे प्रश्न, तांडयाची वेदना, तांडयाचे गुणवैशिष्ट्ये आणि तांडा सक्षमीकरणावरील उपाययोजना लक्षात येणार नाही. त्यामुळे शासन, प्रशासन, माध्यम, लोकप्रतिनिधी बरोबरच समाजातील नागरी जीवनाशी जुुळलेले प्रज्ञावंत , आत्मनिर्भर सुशिक्षित, उद्योजक अशा वर्गानी 'पे बॅक टू सोसायटी' म्हणून पुढे येण्याचे संदेेश या चळवळीतून दिल्या जाते. आजच्या जागतिकीकरणात आपल्या जन्माच्या तांडयाशी नाळ कायम टिकवण्यासाठी यामाध्यमातून सकारात्मक प्रयत्न केला जातो.

संविधानिक जाणिवेची पेरणी[संपादन]

संविधानिक जाणीवेने तांडा शिक्षित व्हावा. तांडयालाही मुलभूत अधिकार मिळावेत. देशाच्या सर्वोच्च संविधानाविषयी तांडयातील नव्या पिढीला प्रकर्षाने जाणीव व्हावी. यासाठी 'तांडेसामू चालो'च्या माध्यमातून पहिल्यांदाच बंजारा भाषेतून 'हाम भारतेर लोग' या संविधान तांडा जागर मोहीमेस स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सुरुवात झाली. बंजारा इतिहासातील हे एक क्रांतिकारी पाऊल ठरले. तांडा संविधान साक्षर नाही, त्यामुळेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील तांडयाची अवहेलना थांबलेली नाही. त्यामुळे तांड्याने आता संविधानाचा मार्ग अवलंबीणे गरजेचे आहे. तांडयाचा उत्कर्षाचा मार्ग हा संविधान साक्षरता आणि वसंतविचारधारातूनच प्रशस्त होऊ शकेल. संविधानाच्या कलमाने आणि अभिप्रेरणेने तांडा साक्षर होणे गरज असल्याचे महत्व 'तांडेसामू चालो' मधून दिल्या जात आहे.[८] [९][४][१०]

 [११][१२][१३][१४][१५][१६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "तांडेसामू चालो : वंचितांचा समग्र पुनरूत्थानाचा विचारप्रवाह". मुंबई: The voice of mumbai. २०१७. Archived from the original on 2021-10-18. 2021-10-18 रोजी पाहिले.
  2. ^ "खेड्यांकडे चला". महाराष्ट्र टाइम्स. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "बंजारा तांडा शिक्षित व्हावा, सक्षम व्हावा हेच स्वप्न". नागपूर: लोकमत. २०१८.
  4. ^ a b "तांडेसामू चालो ही एक लोकोत्तर संकल्पना". श्रीक्षेत्र पोहरागड: सकाळ वृत्तपत्र. २०१७.
  5. ^ "तांडयाच्या समग्र पुनरुत्थानासाठी शासन कटीबद्ध". The Voice of Mumbai. २० डिसेंबर २०१७. Archived from the original on 2021-11-28. 2023-02-24 रोजी पाहिले.
  6. ^ "'खेेडयाकडे चला' आणि 'तांडेसामू चालो' : सबलीकरणाची आयुधे". बंजारा पुकार: ०३. डिसेंबर २०२०.
  7. ^ "तांड्याचे विकासाच्या वाटा खूला". मुंबई: मुंबई व्हाईस. २०१८. Archived from the original on 2021-11-28. 2021-10-26 रोजी पाहिले.
  8. ^ "हाम भारतेर लोग : बंजारा तांडयावर पहिल्यांदाच संविधान जागर". नागपूर: लोकमत न्यूझ. २६ नोव्हेंबर २०२१. pp. ४.
  9. ^ "बंजारा इतिहासातील क्रांतिकारी पाऊल". नागपूर: सकाळ वृत्तपत्र. २०२१.
  10. ^ पवार (नायक), एकनाथ (मे २०२२). बंजारा तांडा 'संविधान साक्षर तांडा' व्हावा. अ. भा. बंजारा साहित्य संमेलन वाशीम. pp. ४१.
  11. ^ "स्मार्ट तांडा : गरज, उपाय आणि आव्हाने". Cmrj. ०१. ऑक्टोबर २०२०.
  12. ^ "'तांडेसामू चालो' अभियान म्हणजे ऑक्सिजन". यवतमाळ: लोकमत वृत्तपत्र. २०१७. pp. ०४.
  13. ^ "जागृतीसाठी 'तांडेसामू चालो'". चंद्रपूर: लोकमत वृत्तपत्र. २०१८. pp. ०२.
  14. ^ जाधव, डॉ. सुभाष (मार्च २०१८). "तांडेसामू चालो : तांडा उत्थानाची लोकचळवळ". पोहरादेवी दर्शन: ०७.
  15. ^ the egalitarian role of the Tandaism ideology of Tandesamu Chalo |paj |Volume -03, ISNN 2394-5303
  16. ^ "तांडा सबलीकरणाचा लोकोत्तर ध्यास : तांडेसामू चालो". मुंबई: गोरबंजारा न्यूझ. २०१७. Archived from the original on 2021-10-18. 2021-10-18 रोजी पाहिले.