चर्चा:तांडेसामू चालो

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सदर लेख संदर्भासह असून नवीन वैचारिक आशयाचा आहे.

संपादनातील टंकलेखन दोष सुधारण्यास व नवीन साचा जोडण्यास मदत हवी. Govr1 (चर्चा) २२:०८, ११ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

पान, लेख कायम ठेवणेबाबत[संपादन]

सदर लेख अतिशय उपयुक्त व सामाजिक जाणिवा आणि परिवर्तनाचा विधायक संदेश देणारा आहे. परंतु संतोषजी गोरे आपणास या लेखाबद्दल आपणास कोणती अडचण आहे. सदर पान वगळण्याच्या आपल्या भूमिकेचा कारणासह तपशील दयावे. Govr1 (चर्चा) २०:१९, १४ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

नमस्कार, चर्चे बद्दल धन्यवाद. सदरील लेख हा निबंध किंवा ललित लेखाप्रमाणे लिहिल्या गेलाय. लेखात सुधारणा हवी आहे, विषयात स्पष्टता असावी, संदर्भ असावेत, संदर्भ कसे द्यावेत ते येथे टिचकी देऊन नीट समजून घेणे. विशेष म्हणजे हा लेख तांडा लेखाचा परिच्छेद होऊ शकतो. लेख काढल्या जाणार नसून, गरज पडल्यास तांडा मध्ये नवीन परिच्छेदात समाविष्ट करण्यात येईल. आपण लेखात सुधारणा करावी. तद्नंतर चर्चा करून पुढील सूचना दिल्या जाईल. - संतोष गोरे ( 💬 )
@Govr1: कृपया, सदरील लेखात मी एक संदर्भ दुरुस्ती केली आहे; बंजारा तांडा शिक्षित व्हावा, सक्षम व्हावा हेच स्वप्न, ते पाहावे. त्यानुसार प्रत्येक संदर्भास दुवा देणे आवश्यक आहे.- संतोष गोरे ( 💬 ) २३:२३, १७ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

तांडेसामू चालो हे स्वतंत्र लेख आहे. आपण वर्ग केलेले साचे कृपया काढावेत. ८ मार्च २०१८ मध्ये सदर संकल्पनेचा विधान परिषदेत विशेष उल्लेख करण्यात आला. शिवाय १३ डिसेंबर २०१८ रोजी विदर्भ मराठवाड्यातील सन्मानिय आमदाराने या संकल्पनेची दखल घेत विधानभवन परिसरात आंदोलन सुद्धा केली. ही बाब ऐतिहासिक नसून तर काय आहे. अनेक संदर्भ ग्रंथात आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल मध्ये 'तांडेसामू चालो' या विचारधारा विषयी शोध लेख प्रसिद्ध झालेली आहे. बंजारा समाजातील अनेक नामवंत प्रतिभावंताच्या रचना बंजारा भाषेतून भजन व कवितेच्या स्वरूपात आहे. जे गुगलवर पहायला मिळेल. एवढे संदर्भ पुरावे असतांना आपण सदर लेखाविषयी दाखवीत असलेली नकारात्मक समर्पक नाही. आपण लावलेले वर्ग साचे काढण्यात यावे. तांडा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही चळवळ आहे. ही चळवळ विकिपीडियाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचल्यास एक विधायक काम केल्याचा समाधान लाभू शकेल. धन्यवाद.! Govr1 (चर्चा) २३:४७, १७ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

कृपया येथील सर्व चर्चा नीट समजून घ्यावी. विकिपीडियावर लेख लिहिताना पाल्हाळ लावण्यापेक्षा अचूक मुद्दे लिहावेत. तसेच आपण लक्षात घ्यावे की आपण संदर्भ बरोबर जोडत नाहीयेत. मी वर उल्लेख केला आहे ते नीट पाहावे. सदरील लेखात मी एक संदर्भ दुरुस्ती केली आहे; बंजारा तांडा शिक्षित व्हावा, सक्षम व्हावा हेच स्वप्न, ते पाहावे. त्यानुसार प्रत्येक संदर्भास योग्य दुवा म्हणजे वेबसाईट ची लिंक देणे आवश्यक आहे.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:१८, १८ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

आपण लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. परंतु रिसर्च पेपर्स व संदर्भ ग्रंथांची लिंक कशी काय देता येईल. एवढी नकारात्मक आणि आकस केवळ लेखाबद्दल दिसून येतो. इतरांबद्दल असे निकष लावून बघावे.एवढे संदर्भ देऊनही अजून किती संदर्भ हवे. महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळात चौकशी कराल, माहिती मिळेल. (८ मार्च २०१८ रोजीचे प्रश्न, मागणी, विशेष उल्लेख बद्दल) काही तांत्रिक सुधारणा नसल्यास आपण करावी, परंतु नकारात्मक साचे लावून एवढया सर्जनशील चळवळीबद्दल दुजाभाव दाखवणे संयुक्तिक नाही. Govr1 (चर्चा) ०८:२०, १८ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

लेखाला लावलेले नकारात्मक साचे काढण्यात यावे[संपादन]

तांडेसामू चालो हे स्वतंत्र लेख आहे. आपण वर्ग केलेले नकारात्मक व त्रुटी दर्शक साचे कृपया काढावेत. वाटल्यास लेखातील टंकलेखन दोष सुधारण्यास मदत करावी. परंतु कोणत्याही पूर्वग्रहदूषित भावनेने सदर लेखाविषयी नकारात्मकता दाखवू नये. महत्त्वाचे, ८ मार्च २०१८ मध्ये सदर संकल्पनेचा विधान परिषदेत विशेष उल्लेख करण्यात आला. शिवाय १३ डिसेंबर २०१८ रोजी विदर्भ मराठवाड्यातील सन्मानिय आमदाराने या संकल्पनेची दखल घेत विधानभवन परिसरात आंदोलन सुद्धा केली. ही बाब ऐतिहासिक नसून तर काय आहे. अनेक संदर्भ ग्रंथात व आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नल मध्ये 'तांडेसामू चालो' या विचारधारा विषयी शोध लेख प्रसिद्ध झालेली आहे. बंजारा समाजातील अनेक नामवंत प्रतिभावंताच्या रचना बंजारा भाषेतून भजन व कवितेच्या स्वरूपात आहे. जे गुगलवर पहायला मिळेल. एवढे संदर्भ पुरावे असतांना आपण सदर लेखाविषयी दाखवीत असलेली नकारात्मक समर्पक नाही.

आपण लावलेले चुकीचे साचे काढण्यात यावे. तांडा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही चळवळ आहे. ही चळवळ विकिपीडियाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचल्यास एक विधायक काम केल्याचा समाधान लाभू शकेल. Govr1 (चर्चा) ००:१३, १८ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

@Govr1:
या लेखात माहिती कमी आणि व्यक्तिगत मते अधिक (जवळपास सगळेच व्यक्तिगत किंवा स्तुतीपर मते) आहेत.
हा लेख सध्या काढत नाही परंतु यातील व्यक्तिगत मते आणि स्तुतीपर विधाने काढून त्याजागी माहिती घालावी.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०२:४५, १८ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

हा लेख काढण्याचा आपला आकस आणि नकारात्मकता दिसून येते. हा निकष इतर समाज व संस्कृती आणि व्यक्तीचित्रणावर लिहिलेले हजारो लेख आहेत. त्याविषयी आपली भूमिका मवाळ?? राज्य विधीमंडळात वरिष्ठ सभागृहात दि. ८ मार्च २०१८ रोजी या संकल्पनेचा, चळवळीचा विशेष उल्लेख केला गेला. अनेक संदर्भ ग्रंथ व रिसर्च पेपर्स मध्ये शोध लेख प्रसिद्ध झालेले आहे. सदर संदर्भ लेखात जोडलेले आहे. लेख काढण्याची भाषा म्हणजे विधीमंडळात उल्लेख केलेल्या लोकप्रतिनिधींचा व समस्त बंजारा चळवळीचा सन्मान असेल काय? संतोष गोरे आणि आपण आपला हेतू काय? Govr1 (चर्चा) ०८:३०, १८ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

हा लेख काढण्याचा येथे कोणताही आकस किंवा नकारात्मकता नाही. हे तुमचे व्यक्तिगत मत हा तुमचा गैरसमज आहे. जर आकस असता तर हा लेख कधीच काढला गेला असता.
तसे न करता योग्य निकषांनुसार ही माहिती येथे यावी यासाठीचा प्रयत्न आहे.
विकिपीडिया कोणाचा ही सन्मान किंवा उदोउदो करण्याची जागा नसून माहिती योग्य त्या प्रकारे एकत्रित करण्यासाठीचा उद्योग आहे. आशा आहे आपण याबद्दल अभ्यास केला असेलच. नसल्यास लगेचच करावा ही आग्रहाची विनंती.
इतर लेखांमध्ये कमीपणा दिसल्यास आपण तो दूर का करीत नाही? आपला तर तेथे कोणता आकस नाही ना?
अभय नातू (चर्चा) ०८:३७, १८ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद. रिसर्च करूनच सदर लेख लिहिला गेला आहे. नव्याने अनेक संदर्भ जोडले गेले असून सदर लेख कायम करण्यात यावे. विविधता ही भारतीयांची खरी शक्ती असून त्याप्रती निरपेक्ष दृष्टीने बघणे,ही आम्हा भारतीयांची संस्कृती आहे. अभिनव म्हणून बंजारा संस्कृतीमधिल या सर्जनशील विचारप्रवाहाचा ओळख व्हावी, माहिती असावी या हेतूने हा लेख संदर्भासह लिहिला गेला आहे. यात कोणत्याही बाबीचा उल्लंघन किंवा संवैधानिकतेला बाधा पोहोचेल असे कोणतेही विधान नाहित. आशा आहे, आपण याबाबीचा सकारात्मक विचार करावा. महाराष्ट्र ही सामाजिक प्रयोगाची भूमी आहे, येथून 'तांडेसामू चालो'सारख्या सर्जनशील सुधारणावादी संकल्पनाचा माहितीपर परिचय होत असेल तर स्वागत करायला हवे. Govr1 (चर्चा) २१:१६, १९ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]