डेरा सच्चा सौदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dera Sacha Sauda
डेरा सच्चा सौदा
लघुरूप DSS
ध्येय Universal Brotherhood
स्थापना 29 एप्रिल 1948; 74 वर्षां पूर्वी (1948-०४-29)
संस्थापक Mastana Balochistani, Amukurejuddin Khan
प्रकार
 • NGO
 • Non-profit Social Welfare & Spiritual Organization
वैधानिक स्थिति Active
उद्देश्य [१]साचा:Primary source inline
मुख्यालय Sirsa, Haryana, India
सेवाकृत क्षेत्र
महासचिव
Vipassana Insan[२]
Leader Shah Satnam Singh
संकेतस्थळ www.derasachasauda.org

डेरा सच्चा सौदा हा शीख पंथाचा एक उपपंथ आहे. हा उपपंथ सन १९४८मध्ये शाह मस्तानने स्थापन केला. हरयाणामधील सिरसा येथे डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. भारतात या पंथाचे ५० आश्रम आणि किमान ६० लाख अनुयायी आहेत. आश्रमांचे वार्षिक उत्पन्न ६० कोटी रुपयांहून अधिक आहे. हे आश्रम समाजकार्य करतात. सिरसा गावात त्यांचे रुग्णालय आहे.[ संदर्भ हवा ]

बाबा गुरमीत राम रहीम सिंग या उपपंथाचे सन १९९०पासून प्रमुख आहेत.

२००७ साली बाबा राम रहीम यांनी गुरू गोविंद सिंग यांच्या वेशात जनतेला दर्शन दिले होते, त्यावरून शीख समुदायांत मोठा गदारोळ उठला होता.

गुरमीत राम रहीम यांनी ४०० साधूंना नपुंसक करून कामाला जुंपले असल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ]

गुरमीत सिंगांवर सन २००२पासून बलात्काराचे आरोप आहेत. शिवाय खुनाचे दोन आरोप आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांच्यावर भरलेल्या खटल्यांचा निकाल [[पंचकुला]च्या सीबीआय कोर्टात २५ ऑगस्ट २०१७ रोजी लागला आणि राम रहीम यांना २० वर्षाची सजा ठोठावण्यात आली. निकाल विपरीत लागल्यामुळे तर पंचकुलामध्ये व हरियाणाच्या अन्य शहरांत मोठे दंगे झाले. दंगे होऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून ११५ अर्धसैनिक बटालियन्स धरून सैन्याच्या एकूण ४३ तुकड्या, १० वरिष्ठ आय.पी.एस. पोलीस अधिकारी, २५०० शिपाई, २००० होमगार्ड्‌स यांचा काही उपयोग झाला नाही. पंचकुलात भारतीय दंड संहितेचे १४४वे कलम लावले होते, पण ते लावण्याच्या आदेशामध्ये पाचपेक्षा अधिक माणसांनी एकत्र येऊ नये हे वाक्य घालायचे राहिले. दंगेखोरांची धरपकट झालीच तर त्यांना ठेवण्यासाठी चंदीगडमधील क्रिकेट स्टेडियमचा तुरुंगासारखा वापर करता यावा, अशी व्यवस्था झाली होती. पंचकुला शहरातील सर्व शाळा-कॉलेजे, सरकारी आणि खासगी कार्यालये त्या दिवशी बंद होती.

अटकेनंतर[संपादन]

गुरमीत राम रहीम सिंगाला अटक केल्यानंतर त्याच्या सर्व मठांच्या झडत्या घेण्यात आल्या. त्याच्या अनेक सहकाऱ्यांना पोलीस कोठडी टेवण्यात आले.

सिरसा येथील मुख्यालयात सापडलेले आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेले घबाड[संपादन]

 • आक्षेपार्ह माहितीचा खजिना असलेले संगणक
 • अनेक हार्ड डिस्क ड्राईव्ह
 • लेबल नसलेली औषधे
 • अनधिकृत समांतर चलन म्हणून वापरली जाणारी टोकने
 • तीन भुयारे (त्यांतले एक महिला साधूंच्या निवास स्थानाकडे आणि दुसरे मुलींच्या कॉलेजच्या हॉस्टेलकडे जात होते.
 • नोंदणी नसलेली लेक्सस कार
 • रेडिओ/टीव्हीवर ब्रॉडकास्ट करण्यासाठी औटडोअर रेकॉर्डिंग करण्याची सोय असलेली एक ओबी व्हॅन
 • चलनात नसलेल्या जुन्या नोटा

संदर्भ[संपादन]

 1. ^ a b DSS (11 May 2013). "About Dera Sacha Sauda (DSS) – Social Welfare & Spiritual Organization". 5 November 2016 रोजी पाहिले.
 2. ^ "Thousands of Patients examined in the Largest Eye Screening Camp". DSS. 12 December 2013. 9 November 2016 रोजी पाहिले.
 3. ^ "State-wise list of VOs/NGOs signed up on the NGO-PS - Haryana(1183)". 12 August 2004. 9 November 2016 रोजी पाहिले.[permanent dead link]