Jump to content

जे. साई दीपक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जे साई दीपक
जन्म जे. साई दीपक अय्यर[]
२३ नोव्हेंबर, १९८५ (1985-11-23) (वय: ३९)
हैदराबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
पदवी हुद्दा वकील, अभियंता
धर्म हिंदू

जे. साई दीपक अय्यर हे एक भारतीय वकील आहेत जे प्रामुख्याने इंडिया/भारत टेट्रालॉजीचे लेखक म्हणून ओळखले जातात. साई दीपक हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात आणि दिल्ली उच्च न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात.[][]

वैयक्तिक आयुष्य आणि कारकीर्द

[संपादन]

साई दीपक यांचे शिक्षण सेंट अँथनी हायस्कूल, हैदराबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी अण्णा विद्यापीठ येथून यांत्रिकी अभियंता (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याच सोबत त्यांनीआयआयटी खरगपूरच्या राजीव गांधी स्कूल ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉमधून कायद्याचे पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले.[]

साई दीपक हे अनेक गाजलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रकरणांमध्ये फिर्यादी आहेत. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाच्या प्रकरणातील त्यांच्या युक्तिवादासाठी ते प्रसिद्ध आहेत, जिथे त्यांनी असा युक्तिवाद केला की भगवान अयप्पा हे नैष्टिक ब्रह्मचारी आहेत, जे गुरुकुलातील रहिवाशांच्या प्रमाणे महिलांशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत.[] त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की देवता एक जिवंत व्यक्तिमत्व असून भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ आणि २५ मध्ये नमूद केलेल्या धार्मिक स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारांचा ते लाभ घेऊ शकतात.[]

साई दीपक यांनी भारत सरकारच्या पद्मनाभस्वामी मंदिराच्या संभाव्य व्यवस्थापनावरील खटले,[] आणि बासमती तांदळाच्या भौगोलिक मानांकन वादावरही युक्तिवाद केला आहे. बासमती प्रकरणात त्यांनी मध्य प्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व केले होते.[] भारतीय दंड संहिता,[] मधील वैवाहिक बलात्कार अपवादाविरुद्ध जनहित याचिका आणि समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी जनहित याचिका या प्रकरणांमध्ये देखील त्याचा सहभाग आहे.[१०]

२०१८ च्या भीमा कोरेगाव हिंसाचारात कथित भूमिका बजावलेल्या गौतम नवलखा यांची अटक रद्द केल्यावर न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्यावर आनंद रंगनाथन यांनी टीका केली होती. सदरील न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्यात दीपक हे आनंद रंगनाथन यांचे वकील आहेत.[११] प्रार्थनास्थळ अधिनियम, १९९१ च्या घटनात्मक पुनरावलोकनाची मागणी करणाऱ्या खटल्यात ते काशीच्या राजघराण्याचे वकील देखील आहेत.[१२]

साई दीपक हे एक हिंदू राष्ट्रवादी आणि वसाहतवादी आहेत.[१३][१४][१५] आणि फर्स्टपोस्टमध्ये नियमित स्तंभलेखक देखील आहेत.[१६] ते दोन ब्लॉगही लिहितात; पैकी पहिला ब्लॉग हा संवैधानिक सिद्धांत आणि कायदेशीर तत्त्वज्ञानावर;[१७] युक्ती नावाचा ब्लॉग आहे. तर दुसरा दि डिमांडिंग मिस्ट्रेस हा असून सिव्हिल, कमर्शियल आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ वर त्यात लिखाण केले जाते. या ब्लॉगचा उल्लेख मद्रास उच्च न्यायालयाने TVS विरुद्ध बजाज ऑटो बौद्धिक संपदा विवादावरील निर्णयात केला आहे.[१८]

साई दीपक हे सुब्रमण्यम स्वामी, राजीव मल्होत्रा, संजीव सन्याल, आनंद रंगनाथन, स्मिता प्रकाश आणि अभिजित चावडा यांच्यासमवेत, इंग्रजी भाषिक हिंदुत्व विचारवंतांचा भाग आहेत, जे प्राचीन हिंदू संस्कृतीतील ज्ञान प्रणालीबद्दल विचार करतात. यामुळे ते उजव्या विचारसरणीचे म्हणून देखील संबोधले जातात.[१९]

लिखाण आणि कार्य

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ J. Sai Deepak Iyer's masterclass on taking on Shashi Tharoor & Hindu identity vs. consciousness (इंग्रजी भाषेत), 2023-09-14 रोजी पाहिले
  2. ^ "Lord Ayyappa at Sabarimala too has rights under Article 21, SC told". Indo-Asian News Service. 26 July 2018. साचा:ProQuest.
  3. ^ "Sabarimala case: Deity living person, has right to privacy, women devotees to SC". Indian Express. Mumbai. 27 July 2018. साचा:ProQuest.
  4. ^ Iyer, Lakshmi (6 August 2018). "Small talk: The Deity's Advocate". Mumbai Mirror. साचा:ProQuest.
  5. ^ "Written Submissions to the Supreme Court of India in the Sabarimala Temple Entry Case" (PDF). February 2019.
  6. ^ "Sabarimala #5: Respondents Argue Every Instance of Exclusion Not Akin to Discrimination". Supreme Court Observer (इंग्रजी भाषेत). 26 July 2018. 2023-08-17 रोजी पाहिले.
  7. ^ "Written Submissions to the Supreme Court of India in the Padmanabhaswamy Temple Administration Case" (PDF). April 2019.
  8. ^ Delhi High Court (2019-04-25). "Judgement for the State of Madhya Pradesh vs Union of India case" (PDF). LiveLaw. 2023-08-17 रोजी पाहिले.
  9. ^ "Challenge to the Marital Rape Exception". Supreme Court Observer (इंग्रजी भाषेत). 2023-08-17 रोजी पाहिले.
  10. ^ B, Kanchan (2023-05-10). "Petitioners Have A Cause, But No Case: Read Advocate Sai Deepak's Arguments In Same Sex Marriage Case". www.verdictum.in (इंग्रजी भाषेत). 2023-08-18 रोजी पाहिले.
  11. ^ "'Am a free speech absolutist': Author Anand Ranganathan in contempt case". Indo-Asian News Service. 24 May 2023. साचा:ProQuest.
  12. ^ "Supreme Court to hear pleas challenging constitutional validity of Places of Worship Act on October 11". Financial Express. New Delhi. 9 September 2022. साचा:ProQuest.
  13. ^ "Hindus a global minority facing existential crisis". द टाइम्स ऑफ इंडिया. New Delhi. 12 February 2023. साचा:ProQuest.
  14. ^ Sen, Anandaroop (4 May 2023). "J Sai Deepak's India that is Bharat: Coloniality, Civilisation, Constitution . Bloomsbury 2021". Social Dynamics. 49 (2): 376–385. doi:10.1080/02533952.2023.2236899.
  15. ^ "Decolonising India: Is Bharat trying to reinvent itself?". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-06-12 रोजी पाहिले.
  16. ^ "J Sai Deepak - Latest Articles, Top Headlines, News Stories Updates". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2023-07-12 रोजी पाहिले.
  17. ^ "Yukti". Yukti (इंग्रजी भाषेत). 2023-06-22. 2023-08-17 रोजी पाहिले.
  18. ^ Madras High Court's Judgement (18 May 2009). "M/S TVS Motor Company Limited vs M/S Bajaj Auto Limited on 18 May, 2009". Indian Kanoon.
  19. ^ "J Sai Deepak is wrong: Indian democracy is not Hindu will".
  20. ^ Basu, Prasenjit K. (2021-10-16). "Book transforms the discourse about 'coloniality' in Bharat". The Sunday Guardian Live (इंग्रजी भाषेत). 2023-06-12 रोजी पाहिले.
  21. ^ "How India, a victim of conflicting colonialities, is coming out of slumber to reboot its tampered mind". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2022-09-06. 2023-06-12 रोजी पाहिले.
  22. ^ Yadav, Yogendra (2022-05-06). "India needs to challenge colonialism in its own language. But solution isn't Hindu worldview". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-06-12 रोजी पाहिले.
  23. ^ "Re-Discovering Bharat". Star of Mysore. 16 December 2022. साचा:ProQuest.