जिम सरभ
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २७, इ.स. १९८७ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
| |||
जिम सरभ (जन्म २७ ऑगस्ट १९८७) हा एक भारतीय अभिनेता आहे जो त्याच्या चित्रपट आणि रंगमंचावरील कामासाठी ओळखला जातो.[१][२]
त्याला फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार आणि आय.आय.एफ.ए. पुरस्कार मिळाले आहेत व आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
नीरजा (२०१६) या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी बायोपिकमध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली, ज्याने त्याला समीक्षकांकडून सकारात्मक पुनरावलोकने मिळवून दिली आणि फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्काराचे नामांकन मिळाले.[३] पीरियड ड्रामा पद्मावत (२०१८) आणि बायोपिक संजू (२०१८) मध्ये विरोधी भूमिका साकारण्यासाठी तो प्रसिद्ध झाला. ए डेथ इन द गुंज (२०१७), गंगूबाई काठियावाडी (२०२२) आणि मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे (२०२३) या चित्रपटांचाही तो भाग होता. २०२२ मध्ये, त्याने रॉकेट बॉईज या मालिकेत डॉ. होमी भाभा यांची भूमिका केली, यासाठी ५१ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकन मिळाले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ Pillai, Pooja (3 April 2016). "Neerja Actor Jim Sarbh Acting Naturally". The Indian Express. 16 April 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 April 2016 रोजी पाहिले.
- ^ "Meet Jim Sarbh, the terrorist who gunned down Sonam Kapoor in Neerja". India TV. 1 March 2016. 22 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 April 2016 रोजी पाहिले.
- ^ "Star Screen Awards 2016 winners list: Pink wins big, Big B-Alia get best actor and actress award". India Today (इंग्रजी भाषेत). 2016-12-05. 15 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-01-28 रोजी पाहिले.
- ^ "International Emmy Awards 2023: Shefali Shah, Jim Sarbh And Vir Das Nominated". NDTV. 27 September 2023.