जागतिक मराठी परिषद
Appearance
स्थापना
[संपादन]जागतिक मराठी परिषदेची स्थापना १९८९ साली झाली.
संस्थापक
[संपादन]भा.कृ देसाई, मनोहर जोशी, माधव गडकरी आणि शरद पवार.
उद्देश
[संपादन]जागतिक पातळीवर मराठी भाषकांना एकत्र आणावे, मराठी भाषा व संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी, उद्योगात मराठी माणसाची प्रगती होण्यासाठी त्याला उद्युक्त करावे आणि या सर्व संदर्भात विचारांची देव-घेव व्हावी या उद्देशाने जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली.
अधिवेशने
[संपादन]- १९८९ - मुंबई (अध्यक्ष वि.वा. शिरवाडकर
- १९९१ - मॉरिशस (अध्यक्ष पु.ल. देशपांडे)
- १९९४ - दिल्ली (अध्यक्ष वसंत गोवारीकर)
- १९९६ - जेरुसलेम, इस्रायल (अध्यक्ष प्रभाकर देवधर)
- १९९९ - हैदराबाद (अध्यक्ष रघुनाथ माशेलकर)
जागतिक मराठीपरिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा’ या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली.