चित्रपट संकलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिनेमा संकलन ही चित्रपटाचे चित्रीरिकरण झाल्यावर कथेप्रमाणे विविध प्रसंगांची योग्य मांडणी करण्याची व सुयोग्य काटछाट करण्याची प्रकिया आहे. साधारणपणे चित्रपट संपूर्णपणे चित्रित झाल्यावर मग संकलनाकरिता पाठविला जातो.

पूर्वी संकलन स्टेनबॅक नावाच्या एका मोठ्या यंत्रावर करण्यात यायचे. परंतु आता मात्र ते काम इतर सर्वच कामांप्रमाणे संगणकावर होते. संगणकावर विविध सॉफ्टवेअर आज्ञावल्या वापरून चित्रपट संपादित होतो. काही प्रमुख सॉफ्टवेअर अशी : ॲव्हिड [१], फायनल कट प्रो [२].

याशिवाय आणखी काही सॉफ्टवेअर बाजारात उपलब्ध आहेत, परंतु बहुधा वरील दोनच सॉफ्टवेअर्सचा व्यावसायिक कामांसाठी वापर केला जातो.