जलसार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?जलसार
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .९०८५७ चौ. किमी
जवळचे शहर पालघर
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,१५३ (२०११)
• २,३७०/किमी
भाषा मराठी
सरपंच श्री. गणेश भोईर
बोलीभाषा
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८

गुणक: 19°31′51″N 72°48′10″E / 19.5307°N 72.8028°E / 19.5307; 72.8028


जलसार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला मांडे मार्गाने गेल्यावर मिठागर गावानंतर हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव ७.७ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१५ कुटुंबे राहतात. एकूण २१५३ लोकसंख्येपैकी १११८ पुरुष तर १०३५ महिला आहेत. गावाची साक्षरता ८२.४८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.७७ आहे तर स्त्री साक्षरता ७४.६२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २३० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.६८ टक्के आहे.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुध्दा सफाळेवरुन उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

कांद्रेभुरे, मिठागर, बंदर, कोरे, खर्डी, टेंभीखोडावे, वाढीवसरावली, वेढी, नवघर, उंबरवाडा तर्फे मनोर, खारवडश्री ही जवळपासची गावे आहेत.जलसार ग्रामपंचायतीमध्ये जलसार, खारमेंडी आणि खारवडश्री ही गावे येतात.

संदर्भ[संपादन]

1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html 2. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc