जपान एअरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जपान एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
JL
आय.सी.ए.ओ.
JAL
कॉलसाईन
JAPANAIR
स्थापना १ ऑगस्ट १९५१
हब हानेडा विमानतळ
नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे ओसाका
नागोया
फुकुओका
नाहा
सप्पोरो
फ्रिक्वेंट फ्लायर जे.ए.एल. माइलेज बँक
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या १६३
गंतव्यस्थाने ९२
ब्रीदवाक्य Fly into tomorrow
मुख्यालय टोकियो
मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले जपान एअरलाइन्सचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान

जपान एअरलाइन्स (जपानी: 日本航空) ही जपान देशामधील दुसर्‍या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी (ऑल निप्पॉन एअरवेज खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एअरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एअरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले.

सध्या जपान एअरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एअरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.[१]

ही जपानची झेंडाधारी एअर लाइन आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एअरवेज नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.[२] यांचे मुख्य कार्यालय जपानमधील टोकियो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र टोकियोचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि टोकियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा एअर पोर्ट) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.

इतिहास[संपादन]

दुसरे जागतिक महायुद्ध झाल्यानंतर देशाचे प्रगतीच्या दृष्टीने दळणवळणाची निकड विचारात घेऊन जपान सरकारने खात्रीशीर वेगवान विमान दळणवळण व्यवस्था नजरेसमोर ठेऊन जपान एअर लाइन्स या विमान कंपनीची १ ऑगस्ट १९५१ रोजी स्थापना केली.[३] यासाठी १० कोटी यान भागभांडवल गुंतविले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय जपानमधील चुओ,गिंजा येथे आहे. फिलिपिन एअर लाइन्सचे डग्लस DC-3 किनसेई, हे विमान भाडेतत्त्वावर घेऊन २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान एअरलाइन सेवा चालू केली.

महायुद्धानंतर दि. २५ ऑक्टोबर रोजी खर्‍या अर्थाने जपानचे आंतरदेशीय विमान सेवेचे मोकुसेई नाव दिलेल्या मार्टिन २-०-२ या विमानाने उसन्या घेतलेल्या नॉर्थवेस्ट एअर लाइनच्या वैमानिकाच्या मदतीने विमान आकाशात उड्डाण करून सेवेचे उद्‌घाटन केले.

दि.१ ऑगस्ट १९५३ रोजी जपानचे राजकीय सभेत जपान एअरलाइन्स विमान कंपनी कायदा मंजूर केला. १ ऑक्टोबर रोजी राज्याचे मालकीची ही विमान कंपनी संबोधली आणि सर्व जबाबदार्‍या आणि संपत्ती ही खाजगी पूर्वाधिकारात राहतील असे अंगीकारले. सन १९५३ मध्ये या जपान एअरलाइन्स कंपनीने उत्तरेकडे टोकियो ते सप्पोरो व मिसवा आणि दक्षिणेकडे नागोया, ओसाका, इवकुणी, फुकुओकापर्यंत आपली सेवा वाढविली.

दि.२ फेब्रुवारी १९५४ रोजी या विमान कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली. डगलस DC- 6बी या विमानाने १८ प्रवासी टोकियो येथून वके आयलंड आणि होनोलुलू मार्गे सॅ‌न्‍फ्रान्सिस्को येथे पोहचविले. या सुरुवातीच्या पहिल्या आणि दुसर्‍या आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणांचे त्यांना अजूनही स्मरण होते.

ही पूर्वीची विमाने अमेरिकन वैमानिक चालवित आणि विमानांची देखभाल सन फ्रान्सिस्कोमध्ये युनायटेड एअरलाइनकडे होते असी जाहिरात केली होती. जपान एअरलाइन्स ने १९५५ मध्ये आपल्या स्थानिक सेवांचा सहभाग ठेवून ओकिनाव्हा मार्गे हाँगकाँगकडे उड्डाण केले. हा मार्ग सन १९५८ मध्ये बँकॉक व पुढे सिंगापूरपर्यंत वाढविला. सन १९५९ मध्ये DC-7Cs चे मदतीने या कंपनीने सिॲटल आणि टोकियोपर्यंतची विनाथांबा सेवा दिली.[४]

कंपनीचे कामकाज आणि संघटन[संपादन]

या कंपनीने विमान सेवेबरोबर देशातील ज्या ५ स्थानिक विमान सेवा आपल्या मालकीच्या केल्या आणि त्या या कंपनीला साहाय्यभूत झाल्या त्या खालीलप्रमाणे आहेत.

  • J-एअर, - टोकियो, नागोया आणि ओसाका या प्रादेशिक जेट सेवा.
  • JAL एक्सप्रेस, दुय्यम शहरातील किफायतशीर जेट सेवा
  • जपान एअर कम्यूटर,- आमामी आयलंडसह पछिम जपान,मध्ये तुरबोपरोप सेवा
  • जपान ट्रान्सुसिन एअर – ओकिनाव्हा प्रिफेक्चर आणि आमामी आयलंडसाठी जेट सेवा.
  • र्युकयू एअर कम्यूटर- ओकिनाव्हा प्रिफेक्चर आणि आमामी आयलंडसाठी जेट सेवा.

या विमान कंपनीची आंतरराष्ट्रीय साहाय्यक विमाने कमी प्रमाणात मिळणारे उत्पन्नाचे हवाई, ओकेयनीय, आणि दक्षिण एशियामध्ये विमान सेवा देतात. JALUX ची स्थापना १९६२ साली झाली.[५] हे या विमान कंपनीला त्यांच्या व्यवसायात मदत करतात. यांची विमाने कोणती असावीत याची निवड करतात. त्यातील आहार, अल्पोपाहार, विक्रीच्या वस्तु, इंधन,केबिन सेवा, विनाकर वस्तु या निवडणे आणि पुरविणे यात लक्ष घालतात. मालवाहतुक व टपाल वाहतुकीसाठी JAL CARGO ही WOW संघटनेची सभासद आहे. ३१ मार्च २००९ अखेर या विमान सेवेने ५००७७९ टन आंतरदेशीय आणि ६२७२१३ टन आंतरराष्ट्रीय माल वाहतूक केली

१ एप्रिल २०११ रोजी या विमान कंपनीने तिचे जपान एअरलाइन्स आंतरराष्ट्रीय कंपनी लिमिटेड. हे नाव रद्द करून जपान एअरलाइन्स कंपनी लिमिटेड असे केले. लंडर असोशिएटने १९८९ मध्ये जपान एअरलाइन्स कंपनीचे ओळख चिन्ह बनविले. जपान एअरलाइन्स आणि जपान एअर सिस्टिमचे एकत्रीकरण झाल्यानंतर नवीन ओळख निर्माण होण्यासाठी लंडरचे टोकियो कार्यालय आणि जपान एअरलाइन्सचे कामकाज एकत्रित चालू झाले. लंडर यांनी सूर्य (“ARC OF THE SUN”) हे बोधचिन्ह वापरण्याचे ठरविलेले होते. २००० सालचे बोधचिन्हाचे बदलाची सुरुवात एप्रिल २००२ मध्ये झाली आणि एप्रिल २००४ मध्ये पूर्ण झाली.[६] ३००००० स्पेशल चीन्हामधून जपान एअरलाइन्ससाठी बोध चिन्ह निवडले. १-४-२०११ मध्ये पुन्हा बदलले आणि सन १९५९ मध्ये जे होते ते कायम केले.

गंतव्य ठिकाण[संपादन]

जपान एअरलाइन्स सांघिक विमान सेवेशिवाय आशिया खंडात अमेरिका, युरोप, ओशेनिया, या देशांतील ३३ आंतरराष्ट्रीय ठिकाणी विमान सेवा पुरविते. तसेच हा संघ जपानच्या ५९ ठिकाणी देशान्तर्गत विमान सेवा देतो. [७]

भागीदारी आणि कायदेशीर सेवाकरार[संपादन]

जगभरातील खालील विमान कंपन्यांबरोबर जपान एअरलाइन्सने कायदेशीर सेवाकरार आणि एकत्रित व्यवसाय करार केले आहेत.

  • अमेरिकन एअरलाइन्स (ट्रान्स-पॅसिफिकसाठी एकत्रित व्यवसाय करार व भागीदारी)
  • ब्रिटिश एअरवेज (सायबेरियन एकत्रित व्यवसाय भागीदारी)
  • कथे पॅसिफिक
  • लाटम एअरलाइन्स,
  • मलेशिया एअरलाइन्स
  • कांटास
  • कतार एअरवेज
  • फिंनाईर
  • S7 एअरलाइन्स
  • श्रीलंकन एअरलाइन्स

याशिवाय जपान एअरलाइन्सने जगभरात खालील विमान कंपन्यांशी भागीदारी, व कायदेशीर सांघिक करार केले आहेत.

  • एअर फ्रान्स
  • बँकॉक एअरवेज
  • चायना एअरलाइन्स
  • चायना ईस्टर्न एअरलाइन्स
  • चायना दक्षिण एअरलाइन्स
  • एमिरेटस
  • जेटब्लू एअरवेज
  • जेटस्टार जपान
  • कोरियन एअर
  • व्हिएटनाम एअरलाइन्स
  • वेस्टजेट

मालवाहतुक (Cargo)[संपादन]

जपान एअरलाइन्सने सुरवातीपासून ३० वर्षे विमाने चालवल्यानंतर ऑक्टोबर २०१० मध्ये ही विमान सेवा बंद केली. प्रवासी विमानातच तळाच्या भागात अल्प प्रमाणात ही सेवा चालू आहे.

विमान सेवा[संपादन]

या विमानात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम वर्ग, स्कायस्लीपर सोलो किंवा स्कायस्लीपर एक्झिक्युटि्व्ह वर्ग, सीझन्स सेल फ्लॅट सीट किंवा स्काय लक्स सीट, प्रीमियम किफायतशीर स्काय सेल सीट आणि किफायत वर्ग आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "जपान एअरलाइन्सच्या विमान संच बद्दल". एअरफ्लीटस.नेट. ८ ऑगस्ट २०१६. 
  2. ^ "२०१५ मधील जगातील सर्वात मोठी विमान कंपनी". फोर्ब्स.कॉम. ८ ऑगस्ट २०१६. 
  3. ^ "जपान एअरलाइन्सचा इतिहास". जल.कॉम. ८ ऑगस्ट २०१६. 
  4. ^ "जपान एअरलाइन्सची सेवा". क्लियरट्रिप.कॉम. ८ ऑगस्ट २०१६. 
  5. ^ "जपान एअरलाइन्स कॉर्पोरेट प्रोफाइल". जलूक्स.कॉम. ९ मार्च २००९. 
  6. ^ "जपानी योजना जाहीर". फ़्ल्याईटग्लोबल.कॉम. ९ जुलै २००९. 
  7. ^ "जपान एअरलाइन्सची गंतव्ये स्थाने". जल.फ्लॅटमॅप्स.कॉम. ८ ऑगस्ट २०१६.