छत्तीसगढमधील आदिवासी
Appearance
छत्तीसगढमधील आदिवासींची यादी.
- अगरिया - जातीचे नाव अग्निपासून आल्याचे मानतात, लोहारकाम करणारे. प्रामुक्याने बिलासपूर, रायपूर जिल्ह्यात राहणारे.
- असुर - मूळचे बिहारचे असल्याचे मानतात. रायगढ, जशपूरच्या डोंगरी भागात राहणारे.
- बैगा - म्हणजे पुरोहित = पंडा, पुजारी आणि वैदु असे दोन्ही काम करणारे. बिलासपूर, दुर्ग या जिल्ह्यातील डोंगरी भागात राहणारे.
- भैना - बैगा आणि कंवर या दोन जातींच्या वर्णसंकरामुळे भैना आल्याचे मानतात. रायगढ, बिलासपूरच्या शेतीच्या प्रदेशात राहणारे.
- भतरा - म्हणजे सेवक, हे प्रामुख्याने बस्तर भागात राहणारे आहेत.
- भुंजिया - प्रामुख्याने रायपूर भागात राहणारे.
- बिंझवार - विंध्य पर्वताजवळ राहणारे म्हणून बिंझवार असे नाव पडले.
- बिरहोड - बिर (वन) होड (राहणारे) वनात राहणारे म्हणून बिरहोड नाव पडले. प्रामुख्याने रायगढ जिल्ह्यात राहणारे, अत्यंत कमी लोकसंख्या असलेले आदिवासी.
- बिरजिया - मूळचे सुरगुजा भागातले.
- धनवार - गोंड, कंवर यांच्या उपजातीतील जात, बिलासपूर, रायगढ, सुरगुजा भागातले.
- धुरवा - प्रामुख्याने बस्तर भागात राहणारे.
- गदबा - गोदावरी नदीजवळ प्रामुख्याने बस्तर भागात राहणारे.
- गोंड - सगळ्यात जास्त संख्या असलेले आदिवासी. यांच्या ३० च्या वर उपशाखा आहेत.
- हलबा - प्रामुख्याने बस्तर आणि दुर्ग भागात राहणारे.
- कमार - मूळचे रायपूर भागातील रहिवासी.
- कंवर - कौरव शब्दाचा अपभ्रंश होवून कंवर झाला असे मानतात. यांच्या ३ उपशाखा आहेत : १) चेरवा कंवर, २) राठिया कंवर, ३) तंवर कंवर. मूळचे रायपूर, रायगढ भागातील रहिवासी.
- खैरवार - खैर म्हणजे काथाचे काम करणारे म्हणून नाव खैरवार नाव पडले. बिलासपूर, सुरगुजा भागातले.
- खडिया - खडखडिया म्हणजे पालखी वाहून नेणारे, यावरून खडिया असे नाव पडले. रायगढ, जशपूर भागात राहणारे.
- कोडकु - जमीन खोदणारे असा अर्थ. रायगढ, सुरगुजा भागातले.
- कोल - भिल्ल किंवा किरात यावरून नावाचा अपभ्रंश कोल झाला असावा असे मानतात. सुरगुजा भागातले रहिवासी. रामचरित मानस मध्ये उल्लेख आहे.
- कंध - कोण्ड किंवा खोण्ड यावरून नावाची व्युत्पत्ती, अर्थ पहाडी लोक. रायगढ जिल्ह्यात जास्त.
- कोरकु - सातपुडा पर्वतरांगांमध्ये राहणारी जमात, रायगढ, जशपूर भागात जास्त संख्येने राहणारे. यांच्या बोपची, बावरिया, मावसी, निहाल, नाहुल, बोंधी, बेंडिया या उपजाती आहेत.
- कोरवा - यांना किसान कोरवा किंवा दिहरिया या नावानेही ओळखले जाते. बिलासपूर, राजगढ, सुरगुजा भागातले रहिवासी. १२ व्या शतकापर्यंत सुरगुजा भागाचे शासक होते.
- कोया - गोदावरी नदीच्या परिसरात राहणारे. कोया गोंडांची उपजात म्हणून मानली गेली आहे. यांच्यात कोर्ला-कोया, गुट्टा-कोया, मेट्टा-कोया अशा उपशाखा आहेत.
- मझवार - मुंडा आणि कंवर या दोन जमातींचे वर्णसंकर होवून मझवार झाले असल्याचे मानतात. बिलासपूर भागात जास्त संख्येने आढळतात.
- मुंडा - बस्तर भागात राहणारे, बस्तर राजवंशाचे गायक म्हणून ओळख.
- नगेसिया - नाग शब्दावरून नावाची व्युत्पत्ती झाली असल्याचे मानतात. रायगढ जिल्हा आणि सुरगुजा भागातले रहिवासी.
- ओरांव - यांना कुडुख, धनका किंवा धनगढ या नावाने सुद्धा ओळखतात. रायगढ आणि सुरगुजा भागातले रहिवासी.
- पांडो - हे पांडवांशी संबंध असल्याचे मानतात. बिलासपूर आणि सुरगुजा भागातले रहिवासी.
- परधान - प्रधान (= मंत्री) शब्दावरून नावाची व्युत्पत्ती. परधान हे गोंड राजांचे प्रधान होते. तसेच हे परंपरेने भाट म्हणून काम करीत आलेले आहेत. लोकांच्या वंशावळी, त्यांचे इतिहास गाण्याच्या रूपात कथन करतात. प्रामुख्याने रायपूर, बिलासपूर भागातले रहिवासी आहेत.
- पारधी - म्हणे शिकारी यांना नाहर म्हणूनही ओळखले जाते. बस्तर भागातले रहिवासी.
- परजा - ही धुरवा जमातीची पोटजात असल्याचे मानले जाते. बस्तर भागातले रहिवासी.
- सौरा - (माहिती उपलब्ध नाही)
- सौंता - बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी.
वरील ३४ मुख्य जमातींशिवाय भुमिया, सवरा, माझी, सहरिया, कोलाम, मवासी, भील आणि आंध या अन्य जमातीही छत्तीसगढ राज्यात अल्पसंख्येने राहतात.
वरील सर्व आदिवासींच्या भाषा तीन मुख्य भाषा परिवारात मोडतात. (१) मुंडा भाषा परिवार, (२) द्रविड भाषा परिवार आणि (३) आर्य भाषा परिवार
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |