चाफळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चाफळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातले एक गाव आहे. पाटण,सातारा जिल्हा या तालुक्यातील एक राजकीय दृष्ट्या महत्वाचे गाव आहे. चाफळ हे मांड नदीच्या उत्तर तीरावर वसले आहे. याच्या चारही बाजूंनी सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. समर्थ रामदासांच्या जीवनकार्यात चाफळचे फार मोठे महत्त्व आहे. चाफेश्वर महादेव नावाचे मंदीर गावात असल्याने गावाला चाफळ हे नाव पडले असे म्हंटले जाते. लहानमोठ्या 45 गावे, वाड्या, वस्त्याचे हे एक मुख्य बाजारपेठेचे केंद्र आहे. चाफळ गावची लोकसंख्या सुमारे 2978 इतकी आहे (2011 च्या जनगणनेनुसार) पुरुष व स्त्रियांची संख्या अनुक्रमे 1480 व 1498 इतकी असून स्त्रीपुरुष साक्षरता 82 टक्के आहे. चाफळ हे नैसर्गिक रित्या खुप सुंदर गाव आहे व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. रामदास स्वामींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. गावामध्ये जि.प. सातारा ची इयत्ता पहिली पासुन ते चौथी पर्यंत प्राथमिक शाळा आहे. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री समर्थ विद्यामंदीर असुन येथे इयत्ता पाचवी ते बारावी (कला) पर्यंत शिक्षणाची सोय आहे.


वैशिष्ट्ये[संपादन]

Chaphal maruti.jpg
चाफळ समर्थ संप्रदायाची राजधानी ठरली

समर्थ रामदासांनी महाबळेश्वरपासून कर्‍हाडपर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभी केली. रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव सुरु केले. चाफळचा मारुती त्यांतील अकरा मारुतींपैकी एक. हे मंदिर गावकर्‍यांनी श्रमदानाने बांधले असे म्हणतात.

चाफळला समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापलेले राम मंदिर आणि दोन मारुती मंदिरे आहेत. येथील प्रताप मारुतीचे मंदिर हे श्रीराम मंदिरासमोर असून दास मारुतीचे मंदिर श्रीराम मंदिराच्या मागे आहे. समर्थांनी चाफळचे राममंदिर शके १५६९ (सन १६४८) मध्ये आपले शिष्य व गावकरी यांच्या मदतीने बांधले. प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेल्या तथाकथित दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातील रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची स्थापना ह्या देवळात केली. पंचवटीचा राम अशा रीतीने कृष्णेच्या खोर्‍यात आला, आणि समर्थ संप्रदायाचे मुख्य मठाचे स्थान चाफळ हे ठरले.

हा श्रीराम दोन्ही हात जोडून उभा आहे. श्रीरामांसमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहिजे म्हणून समर्थांनी सुंदर दगडी मंदिर बांधून त्यात दास मारुतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे ६ फूट उंचीची आहे. चेहऱ्र्‍यावर अत्यंत विनम्र भाव, समोर असलेल्या प्रभू श्रीरामाच्या चरणावर विसावलेले नेत्र, अशी ही मूर्ती आहे. ह्या मारुतीसाठी बांधलेले मंदिर सुमारे सव्वातीनशे वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत आहे. १९६७ च्या भूकंपातसुद्धा या मंदिरास धक्का लागला नाही किवा तडा गेला नाही. समर्थ रामदास यांनी बनवलेली दास मारुतीची मूर्ती अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी आहे चाफळचे हे मंदिर पर्यटकांना आणि भक्तांना आकर्षित करणारी आहे दुपारच्या वेळेस या मंदिरांमध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद स्वरुपात भोजन दिले जाते दुपारची आरती नियमित असते रामदासी संप्रदायाचे सेवक या ठिकाणी अतिशय नम्रतापूर्वक मंदिराची सेवा करतात उपासनेला याठिकाणी विशेष महत्त्व दिले जाते u या गावाचे ग्रामदैवत श्री नांदलाईदेवी आहे.

महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचे हे मूळ गाव होय. [ संदर्भ हवा ].


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.