चर्चा:रंगो बापूजी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य ते बदल करुन या लेखात घालावा -- अभय नातू (चर्चा) ०९:३६, २० ऑगस्ट २०२० (IST)[reply]


रंगो बापूजी गुप्ते हे भारतीय क्रांतिकारक होते.

परदेशात[संपादन]

सातारा येथील मराठा साम्राज्याच्या अखेरच्या राजवटीच्या काळात रंगो बापूजी यांची कारकीर्द आहे. ब्रिटिशांनी १८३९ साली सातारा संस्थान ब्रिटीश साम्राज्यात विलीन केले. याविरुद्ध तक्रार नोंदविण्यासाठी तत्कालीन मराठा राजा प्रतापसिंह यांनी रंगो बापूजी यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला पाठविले.परंतु तेथे तब्बल १४ वर्षे राहूनही त्यांना अपयश आले. [१]

भारतात परत आल्यावर रंगो बापूजी १८५७ साली झालेल्या क्रांतिकार्यात सहभागी झाले. नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांची त्यांनी भेट घेतली आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी सातारा, कोल्हापूर,सांगली आणि बेळगाव या भागात त्यांनी सशस्त्र सैन्याच्या तुकड्या तयार केल्या.[२] परंतु यामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही आणि त्यांचे सैनिक मारले गेल्याने त्यानंतर गुप्ते हे भूमीगत झाले.[३] त्यानंतर १८५७ साली ते ठाणे येथे नातेवाईकाकडे धार्मिक कार्यासाठी गेले असताना ब्रिटिश पोलिस जातली नाका या ठिकाणी त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले. हे समजताच एका वृद्ध बाईचे वेशांतर करून रंगो बापूजी तेथून पसार झाले.त्यानंतर ते गुप्त रूपाने वास्तव्य करून राहिले असे मानले जाते.

स्मारक[संपादन]

रंगो बापूजी यांच्या कार्याचे स्मरण म्हणून सातारा येथे "चार भिंती" हे स्मारक निर्माण करण्यात आले आहे.[४]

हे ही पहा[संपादन]

१८५७ चा उठाव

संदर्भ[संपादन]


  1. ^ "The Quarterly review of historical studies". The Quarterly review of historical studies. Calcutta, India: Institute of Historical Studies. 5–6: 225. Retrieved 30 January 2011.
  2. ^ "Diamond Maharashtra Sankritikosh (Marathi: डायमंड महाराष्ट्र संस्कृतीकोश)," Durga Dixit, Pune, India, Diamond Publications, 2009, ISBN 978-81-8483-080-4.
  3. ^ Singh, M.P. (2002). Encyclopaedia of teaching history. Anmol Publications PVT. LTD. p. 448. ISBN 978-81-261-1243-2.
  4. ^ "Char Bhinti – Hutatma Smarak Satara | SataraDiary". www.sataradiary.com (इंग्रजी भाषेत). 2018-08-20 रोजी पाहिले.