घाटंजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

घाटंजी हे शहर यवतमाळ जिल्ह्यातील एक फार जुने शहर आहे, येथील शेतकरी उच्चकोटीच्या कापसाची शेती करतात म्हणून हे शहर “Cotton City” या नावाने सुद्धा ओळखले जाते. येथे वाघाडी नदीच्या काठावर असलेले ब्राम्हलीन संत श्री मारोती महाराज यांचे देवस्थान आहे. दर वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात येथील आझाद मैदानावर ब्राम्हलीन संत श्री मारोती महाराज यांच्या नावाने फार मोठ्या यात्रे चे आयोजन करण्यात येते. घाटंजी हे शहर “घाटी” व “अंजी” या दोन्ही गावाच्या मध्य स्थीत असल्यामुळे या शहराचे नाव घाटंजी असे पडले आहे. घाटंजी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. या शहराला लागुणच असलेले गाव- अंजी येथे ऐतिहासिक हेमाडपंथी शैलीतील अत्यंत प्राचीन व भव्य श्री नृसिंहचे पाषाण कलाकृती असलेले मंदिर आहे. महाराष्ट्रातूनच नाही तर आंध्रप्रदेशातूनही लाखो भाविक येथे भगवान नृसिंहाच्या दर्शनासाठी येतात. घाटंजी या गावात मराठी व ऊरदू भाषेतून नगर पालिका प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहे तसेच १.श्री समर्थ हायस्कूल व सायन्स ज्यु. कॉंलेज , २.एस. पी. एम. कन्या हायस्कूल ३.एस. पी. एम. मुलांचे हायस्कूल ४.एस. पी. एम. सायन्स व गिलानी आर्ट , कॉंमर्स कॉंलेज हे विद्या मंदिरे प्रामुख्याने आहेत. लगतच्या बेलोरा या गावात “जवाहर नवोदय विद्यालय” हे आहे.

माहिती संकलन- भारत सुविधा (www.BharatSuvidha.com)

घाटंजी तालुका
घाटंजी तालुका
Ghatanjitaluka.JPG
महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील घाटंजी तालुका दर्शविणारे स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा यवतमाळ जिल्हा
जिल्हा उप-विभाग केळापूर उपविभाग
मुख्यालय घाटंजी

क्षेत्रफळ ९६९ कि.मी.²
लोकसंख्या १,२५,१६७ (२००१)
लोकसंख्या घनता १२९/किमी²
साक्षरता दर ७७०५६

तहसीलदार श्री. प्रकाश राउत
लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर
विधानसभा मतदारसंघ आर्णी(अ.ज..)
आमदार राजुभाऊ तोडसाम
पर्जन्यमान ११००.५ मिमी

[yavatmal.nic.in/mGis_gha.htm कार्यालयीन संकेतस्थळ]घाटंजी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
यवतमाळ जिल्ह्यातील तालुके
उमरखेड | झरी जामणी | घाटंजी | आर्णी | केळापूर | कळंब | दारव्हा | दिग्रस | नेर | पुसद | बाभुळगाव | यवतमाळ तालुका | महागांव | मारेगांव | राळेगांव | वणी, यवतमाळ