गोविळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गोविळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.हा भाग महाराष्ट्राच्या कोकणविभागात मोडतो.

भौगोलिक स्थान[संपादन]

लांजा एसटी बस स्थानकापासून वेरवली कोर्ले रस्तेमार्गाने कोर्ले तिठ्यावर डावीकडे वळणाऱ्या रस्त्याने साखरपाकडे जाणाऱ्या मार्गावर डावीकडे हे गाव स्थित आहे. लांज्यापासून २३ किमी अंतरावर हे वसलेले आहे.

लोकजीवन[संपादन]

येथे मुख्यतः मराठा समाजातील लोकांची पिढ्यानपिढ्या वस्ती आहे. मुख्य व्यवसाय भातशेती आहे. काही प्रमाणात दुग्धव्यवसाय केला जातो.आंबा, फणस, रातांबा ह्यांचे उन्हाळ्यात उत्पादन घेतले जाते. लोक धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने भांडण-तंटामुक्त गाव म्हणून हे गाव ओळखले जाते.

हवामान[संपादन]

उन्हाळ्यात येथे फार उष्ण हवामान असते तर हिवाळ्यात कडक थंडी असते. मुबलक प्रमाणात पाऊस पडत असल्याने पाण्याची टंचाई कधीही जाणवत नाही. पाण्याची मुबलकता असल्याने फळभाज्या, फुलभाज्या, पालेभाज्या ह्यांचे वर्षभर उत्पन्न घेतले जाते.

नागरी सुविधा[संपादन]

येथे गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. माध्यमिक शिक्षणासाठी शिपोशी येथे जावे लागते. बाजाररहाटासाठी लांजा,साखरपा, भांबेड ह्याठिकाणी जावे लागते. लांजा एसटी बस स्थानकातून साखरपा,कुरुंदवाड,कोल्हापूर, शिपोशीकडे जाणाऱ्या सर्व बसेस येथे थांबतात.