वर्ग:लांजा तालुक्यातील गावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

देवधे लांजा तालुक्या पासुन २ कि.मी मुंबई पणजी महामार्गावर असलेले गाव ४००० लोकसंख्या असलेले गाव गावात असलेल्या वाड्या १) सम्राट अशोक नगर ( बौध्दवाडी ) लोकसंख्या १३०० घरे ३५० मोठी वाडी ह्या वाडीत नवजीवन बौध्दजन संघ -ग्रामीण/मुंबई यांचे जेतवन बुद्ध विहार तसेच वाडीच्या लगत गाव देवाची दोन मंदिरे आहेत. शिंदोबा व शिंदभैरी मंदिर शिंदोबा देवाची जत्रा क्रांर्तिक एकादशी म्हणजे पंढरपूर यात्रे दरम्यान असते. देवधे हे गाव तंटामुक्त आहे.गुरव वाडी,मंचेकरवाडी,हरमलेकरवाडी,गोंधळीवाडी,बाम्हणवाडी,गवळीवाडी अश्या वाड्यानी वेढलेले गाव आहे. हया गावातून बेनी नदी १२ महिने वाहत असते. हया गावात गुण्यागोविंदाने वागतात. होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. हया गावाला निर्मलग्राम चा पुरस्कार भेटला आहे. बुद्ध पौर्णिमेला सम्राट अशोक नगर मध्ये मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली जाते. मुंबईतील सर्व चाकरमानी उपस्थित असतात. चार ही बाजूने डोंगर दऱ्या असुन निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आहे.

"लांजा तालुक्यातील गावे" वर्गातील लेख

एकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.