Jump to content

घडशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घडशी ही महाराष्ट्रात आढळणारी एक जात आहे बलुते पद्धती मध्ये ही घडशी जात ही मंगलवाद्य सनई चौघडा वाजविण्याचे काम करत तर काही ठिकाणी या जातीच्या लोकांना गावातील पुरातन मंदिरात देवाच्या पादुका च्या पुजेचा मान होता तो अजून आहे या मध्ये प्रामुख्याने जेजुरी, जावली, शिखर शिंगणापुर, म्हसवड , चोरांबे, निनाम पाडळी, खिद्रापूर , नृसिंहपुर, हंगेवाडी, वाडे बोल्हाई, खरसुंडी, औंध , हिठणी ,मंगसुळी,(कर्नाटक) अंकोली, कोळे, नातेपुते तरंगफळ वळई जांभुळणी येथे घडशी समुदाय कडे देवाची पुजा तसेच सनई चौघडा च्या सेवेचा परंपरागत मान आहे तसेच यातील काही कुळे ही परंपरागत राजेरजवाडे येथे मंगल वाद्य सनई चौघडा नौबत वाजवत तर काही राजदरबारी संगीत सेवा देत होती कालांतराने ही राजघराणे खालसा झाल्या मुळे ही पद्धत बंद झाली , देवाच्या सेवेच्या बदल्यात या समुदायाला पूर्वीच्या शासकां कडून इनामी जमिनी देऊ केल्या होत्या त्यास घडशी वतन असे म्हणत होते तसेच इचलकरंजी व कुरुंदवाड येथील घडशी कुळे ही मुस्लीम संत पीर बाबा चे सेवे करी आहेत

आळंदी,कोल्हापूर,जेजुरी,पंढरपूर, मुंबई, शिखर शिंगणापूर,शिर्डी,फलटण, जावली महाबळेश्वर सातारा,कराड,बारामती,म्हसवड,वळई-जांभूळणी, वाडे बोल्हाई , धुळदेव, कांबळेश्वर, आचरा,रामेश्वर,कणकवली,पुणे,वीर,भोर, सासवड,सोमेश्वर,करंजे, मुरूम,भुईंज,पाचवड,वाई,महाबळेश्वर,हुमगाव,इचलकरंजी,नातेपुते,तरंगफळ,माळीनगर,सांगली,शिराळा, नरसिंहवाडी,कुरुंदवाड,पेठ्नाका,माजगाव, निनामपाडळी, कोरेगांव तसेच महाराष्ट्रमधे वेगवेगळ्या ठिकाणी घडशी समाज वास्तव्य करतो

भोसले, जाधव, कदम, मोहिते, मोरे, पवार, वाडेकर, साळुंके, साळुंखे, धुमाळ, चव्हाण, जगताप , इत्यादी आडनावे या समुदायात आढळतात...

पहा : गावकामगार